उदयनराजे भोसले Videos
उदयनराजे सध्या राजकारणात देखील सक्रिय आहेत. सुरुवातीला ते राष्ट्रवादीत होते. नंतर ते भाजपात गेले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ते खासदार म्हणून साताऱ्यातून निवडून आले. राष्ट्रवादीचे आणि राजकारणातील मोठे नेते शरद पवार यांचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याचे देखील बोललं जायचं. २०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर उदयनराजेंचा दबदबा साताऱ्यात वाढला.छत्रपती शिवरायांचे थेट १३ वे वंशज असल्यामुळे त्यांच्याविषयी सातारा नागरिकांमध्ये आदरयुक्त भाव होताच. २०१९ मध्ये ते भाजपात गेले. मात्र त्यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. यावेळी म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत ते पुन्हा भाजपाच्या तिकिटावर उभे राहिले आणि जिंकूनही आले. त्यामुळे राजे आता लोकसभा खासदार आहेत.
Read More