उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
Image of PM Modi
Maharashtra News LIVE Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक, म्हणाले…

Maharashtra Breaking News Live Update : राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर बातम्या जाणून घ्या.

Image of PM Modi
Ajmer Sharif Dargah : ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या ८१३ व्या उरुस निमित्त अजमेर दर्ग्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठवणार चादर

Ajmer Sharif Dargah : २०१४ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला दहा वेळा चादर अर्पण…

Uddhav Thackeray expels jalgaon district chief for anti party activities
जिल्हाप्रमुखांच्या हकालपट्टीने जळगावमध्ये ठाकरे गटाची अवस्था गलितगात्र

दोन्ही जिल्हाप्रमुखांची निवडणूक काळात हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सध्या ठाकरे गट जिल्हाप्रमुखाविना आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरले असून अस्वस्थतता…

Maharashtra Mumbai News Live Updates in Marathi
“शरद पवार-अजित पवार एकत्र आले तर…”, प्रफुल पटेल यांचं मोठं विधान

Mumbai Maharashtra News Live Update : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “महापालिकेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल”, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Ladki Bahin Yojana : शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दावा केला आहे.

ubt chief uddhav thackeray will reconsider contesting bmc elections independently vijay vadettiwar
ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेसची नमती भूमिका!

सत्ताधारी मंत्री गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर मात्र या घटना वाढत जातील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

Chandrashekhar Bawankule : आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…

Maharashtra Breaking News Live Update : बीडमधील सरपंच आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूने राज्य हादरले आहे.

Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान

NCP Sharad Pawar : उत्तम जानकर हे माळशिरसचे आमदार आहेत. २०१९ मध्ये निसटता पराभव स्वीकारलेल्या जानकरांनी यांनी यावेळी भाजपाच्या राम…

Sanjay Shirsat gave a reaction on Raj thackeray and Uddhav Thackeray Meets
Raj Uddhav Thackeray Meets: राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असते तर विधानसभेलाच- संजय शिरसाट

Raj Uddhav Thackeray Meets: राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असते तर विधानसभेलाच- संजय शिरसाट

संबंधित बातम्या