उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
Thackeray Group Exit Poll
Thackeray Group Exit Poll : एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “सर्व्हे काहीही आले तरी…”

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll Updates: आता या एक्झिट पोलच्या अंदाजावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Who Will Be The Next CM? This Exit Poll Prediction
Maharashtra Exit Poll 2024 : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे की अजित पवार? मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कुणाला? काय सांगतो ‘हा’ एक्झिट पोल?

Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होईल याचा अंदाज पिपल्स पल्स या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

Uddhav Thackeray On Vinod Tawde:
Uddhav Thackeray : “भाजपाचा हा नोट जिहाद, बाटेंगे और जितेंगे…”, विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray On Vinod Tawde : जवळपास तीन ते चार तास हा संपूर्ण गोंधळ सुरु होता. मात्र, या गोंधळानंतर विनोद…

Election trend Mumbai, uddhav thackeray, shiv sena, BJP, Eknath shinde, Congress, NCP
मुंबईचा कौल नेहमीच निर्णायक प्रीमियम स्टोरी

मुंबईत यश मिळणारा पक्ष किंवा आघाडीचा राज्याच्या सत्तेचा मार्ग मोकळा होतो. यंदा मुंबईत अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. महायुती आणि…

MNS chief Raj Thackerays criticism of Shiv Sena UBT chief Uddhav Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० तारखेला पार पडणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी राज ठाकरेंनी शिवडी या ठिकाणी…

Maharashtra Top Politicians Social Media Followers in Marathi
Maharashtra Top Politicians Followers : सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस; जाणून घ्या, महाराष्ट्रातील टॉप नेत्यांचे फॉलोअर्स

Maharashtra Top Politicians Social Media Followers : गेल्या महिन्यापासून नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत, पण तुम्हाला माहितीये का, कोणता…

Raj Thackeray criticized Uddhav Thackeray saying that one man divided the entire party
Raj Thackeray:”एका माणसाने आख्ख्या पक्षाची वाट लावली…”; उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (१८ नोव्हेंबर) काळाचौकी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर…

Eknath Shinde, Uddhav Thackeray faction, Kopri,
कोपरीत शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने, दोन्ही गटाच्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी येथील अष्टविनायक चौकात दुचाकी रॅलीदरम्यान शिंदेची शिवसेना आणि ठाकरे…

Uddhav Thackeray holds a grand sabha in bandra east for Varun Sardesai live
Uddhav Thackeray Bandra East Live: वरुण सरदेसाईंसाठी उद्धव ठाकरेंची मातोश्रीच्या अंगणात सभा

Uddhav Thackeray Bandra East Live: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं वांद्रे पूर्वच्या जागेवरून वरूण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांची थेट…

संबंधित बातम्या