उद्धव ठाकरे Videos

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
MNS chief Raj Thackerays criticism of Shiv Sena UBT chief Uddhav Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० तारखेला पार पडणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी राज ठाकरेंनी शिवडी या ठिकाणी…

Raj Thackeray criticized Uddhav Thackeray saying that one man divided the entire party
Raj Thackeray:”एका माणसाने आख्ख्या पक्षाची वाट लावली…”; उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (१८ नोव्हेंबर) काळाचौकी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर…

Uddhav Thackeray holds a grand sabha in bandra east for Varun Sardesai live
Uddhav Thackeray Bandra East Live: वरुण सरदेसाईंसाठी उद्धव ठाकरेंची मातोश्रीच्या अंगणात सभा

Uddhav Thackeray Bandra East Live: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं वांद्रे पूर्वच्या जागेवरून वरूण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांची थेट…

Uddhav Thackerays direct warning to the Mahayuti government
Uddhav Thackeray: ‘हम तुम्हे काटेंगे’ उद्धव ठाकरेंचा महायुतीला थेट इशारा, पंकजा मुंडेंचे मानले आभार

Uddhav Thackeray Speech: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा रविवार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रमुख नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी आयोजित…

Uddhav Thackerays UNCUT speech in Eknath Shindes constituency
Uddhav Thackeray Kopari Pachpakhadi: एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं भाषण UNCUT

Uddhav Thackeray Kopari Pachpakhadi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबरला जाहीर सभा घेतली होती.…

Loksatta loksamvad exclusive interview with Shivsena ubt mla Aditya Thackeray on Maharashtra politics marriage and ministership
Aaditya Thackeray Exclusive: लाडकी बहीण, धारावी, BDD चाळ ते NOTA, आदित्य ठाकरेंची रोखठोक मुलाखत प्रीमियम स्टोरी

Aaditya Thackeray Loksatta Exclusive: महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज लोकसत्ताशी खास बातचीत केली. यावेळी…

uddhav thackeray bag checking in shrigonda video viral
Uddhav Thackeray: श्रीगोंदा येथे उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी; व्हिडीओ आला समोर

श्रीगोंदा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. याआधी औसा आणि वणी…

ताज्या बातम्या