उजनी धरण News

उजनी (Ujani-Dam) हे भीमा नदीवरील मोठे धरण आहे. या धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला यशवंत सागर असेही म्हटले जाते. मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १५१७ गिगालिटर्स इतकी आहे. भीमा नदी ही महाराष्ट्र (७५ टक्के) आणि कर्नाटक (२५ टक्के) अशा दोन राज्यांतून वाहते. पश्चिम घाटातील भीमाशंकर टेकड्यांमधून उगम पावणाऱ्या या नदीच्या कुंडली, घोड, भामा, इंद्रायणी अशा काही उपनद्या आहेत. पुण्यामधून वाहत येणाऱ्या नद्यांच्या प्रवाहामुळे हे धरण नेहमी भरलेले असते.

याच्या बांधकामाची सुरुवात १९६९ मध्ये झाली होती, तर १९८० मध्ये ते बांधून पूर्ण झाले. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होतो. अशा या भव्य धरणाभोवती गेल्या काही वर्षांपासून वाळू उपसून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या विभागामध्ये वाळू माफियांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
Read More
ujani dam water released
उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याला सुरू असलेले आवर्तन बंद करण्याची अहिल्यानगर जिल्ह्यात मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील सिद्धटेक, बेरडी ,जलालपूर ,भांबोरा, दुधोडी, गणेशवाडी, खेड ,आवटेवाडी, शिंपोरा ,बाभूळगाव, मानेवाडी, वायसेवाडी , या परिसरातील शेतकऱ्यांच्या…

indapur flamingo news in marathi
इंदापूर : उजनी काठी पक्ष्यांचे फिरते संमेलन

पाचशेहून अधिक संख्येतील फ्लेमिंगो पळसदेव येथे उजनी धरण पाणलोट परिसरात येऊन दाखल झाल्यामुळे पक्षीप्रेमी व पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे.

सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचे काम रखडल्याचा परिणाम उजनी धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. उन्हाळ्यात पाणीसाठा अजून कमी होणार असून जलपुरवठ्याचे नियोजन कसे करायचे याची चिंता भेडसावत आहे.
उजनी निम्म्यावर; शेतकऱ्यांना चिंता!

सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचे काम रखडल्याचा परिणाम उजनी धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. उन्हाळ्यात पाणीसाठा अजून कमी होणार असून जलपुरवठ्याचे…

Ujani Dam Project Affected Displaced villages Ujani Dam indapur pune district graveyard Demand project affected development authority dam victims
उजनी धरणग्रस्तांची मरणानंतरही वणवण कायम : प्रकल्पग्रस्त विकास प्राधिकरणाची धरणग्रस्तांची मागणी

उजनी धरण पूर्ण होवून आता पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ झाला आहे. मात्र, धरणासाठी त्याग केलेल्या भूमिपुत्रांचे अद्याप प्रश्न सुटले नाहीत.

Ujani dam water release schedule for Solapur and Pandharpur
सोलापूर, पंढरपूरसाठी उजनीतून साडेपाच टीएमसी पाणी सोडले

यापूर्वी उजनी धरणातून शेती सिंचनासाठी गेल्या २५ डिसेंबरपासून कालवा आणि बोगद्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे.

ujani dam boats blast loksatta news
वाळू माफियांवरील कारवाईने उजनी धरणात युद्धजन्य परिस्थिती; वाळू माफियांच्या १३ बोटी स्फोट घडवून फोडल्या

भर दिवसा उजनीतील ‘काळ्या सोन्या’वर डल्ला मारणाऱ्या वाळू माफीयांच्या एका पाठोपाठ १३ बोटी फोडून नष्ट करण्यात आल्या.

Work begins on Shirsodi-Kugaon bridge in Ujani Dam pune news
उजनी धरणातील शिरसोडी- कुगाव पुलाच्या कामाला वेग

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिरसोडी- कुगाव या महत्वकांशी पुलाच्या कामाला वेग आला आहे. सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या या…

12 TMC water to be released from Ujani Dam for Solapur Pandharpur
सोलापूर, पंढरपूरसाठी आणखी दोन आवर्तनांस मंजुरी; उजनीतून १२ टीएमसी पाणी सोडणार

सोलापूर आणि पंढरपूरसह मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदीच्या काठावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे १२…

sand mafias are illegally extracting sand from ujani dam
उजनी धरणाच्या जलाशयात वाळू माफियांचा धुडगूस

रात्री आणि दिवसाही हा वाळू उपसा सुरू असून वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर दंड भरून वाहने सोडविली जातात…

Flamingos and Other Migratory Birds Flock to Ujani Dam
भादलवाडीत चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग

स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर ठरलेल्या उजनीकाठच्या पंढरीत विणीच्या हंगामासाठी बाभळीच्या झाडांवर ‘सारंगार’ बसविण्याची चित्रबलाकांची लगबग सुरू झाली आहे.

Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने इंदापूर-करमाळा तालुक्यांतील ऋणानुबंध ५० वर्षांनंतर पुन्हा प्रस्थापित होणार आहेत.

ujani dam water discharged
उजनीतून दोन महिन्यांत सोडले १०६ टीएमसी पाणी, नीचांकी पातळीवरील उजनीत १२२.३६ टीएमसी पाणीसाठा

उजनी धरणात पाण्याचा भरपूर साठा असल्यामुळे धरणावर कार्यरत असलेल्या विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून एक कोटी ७४ लाख युनिट वीज निर्मिती…