उमेश यादव भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याचा २५ ऑक्टोबरला वाढदिवस असतो. उमेशचे यादव हा मूळचा यूपीच्या देवरिया जिल्ह्यातील आहे, पण त्याचे वडील कोळसा खाणीत कामाला असल्यामुळे ते उत्तर प्रदेशातून नागपूरला आले. विदर्भाकडून खेळणाऱ्या उमेश यादवला २००८ मध्ये रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळण्याची संधी मिळाली, तर २०१० मध्ये त्याने भारतीय संघात पदार्पण केले.
World Test Championship Final updates ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ जूनपासून ओव्हल येथे सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीपूर्वी भारतीय गोलंदाजांच्या…