उमरान मलिक Photos

उमरान मलिक (Umran Malik) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. तो सध्या भारतामधील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. उमरानचा जन्म २२ नोव्हेंबर १९९९ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला. लहानपणापासून क्रिकेटची (Cricket) आवड असणाऱ्या उमरानचा क्रिकेटच्या प्रवास २०२१ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीर संघामध्ये खेळून सुरु झाला. त्याच वर्षी त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही पदार्पण केले. आयपीएल २०२१ मध्ये सनराइजर्स हैदराबाद या संघाने नेट बॉलर म्हणून उमरानची निवड केली. पुढे करोना झाल्याने टी.

नटराजनच्या जागी त्याला खेळवण्यात आले. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी तो पहिला आयपीएल सामना खेळला. सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यामध्ये उमरान मलिकने एका षटकामध्ये सलग ५ चेंडू १५० किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने टाकले. या सामन्यापासून तो चर्चेत आला. २०२२ मध्येही त्याला संघामध्ये खेळवण्यात आले.

जानेवारी २०२३ मध्ये, त्याने श्रीलंकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये १७ व्या षटकात १५५ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकत जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला.
Read More
Fastest Bowlers in IPL History
7 Photos
PHOTOS : IPL इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? पाहा टॉप-६ गोलंदाजांची यादी

Fastest Bowlers in IPL History : मयंक यादवने पदार्पणाच्या सामन्यात ताशी १५५.८ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. त्याचबरोबर आयपीएल इतिहासात…

PHOTO: Team India's young fast bowler Umran Malik gets a chance to debut in the series against New Zealand
12 Photos
PHOTO: टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पणाची संधी

भारतीय संघांचा ताफ्यातील वेगवान गोलंदाज उमरान न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला असून संघ व्यवस्थापन त्याला संधी मिळणार का हा येणारा काळच…

12 Photos
हार्दिक पांड्या ते उमरान मलिक; दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी-२० मालिकेत ‘या’ खेळाडूंकडे असेल लक्ष

आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये संधी मिळते.