७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या आठवड्याला व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखले जाते. पाश्चिमात्य देशातील या खास दिवसाला मागील काही वर्षात भारतातही एखाद्या सणासारखे स्वरूप आले आहे. रोमन साम्राज्यात प्रेमीयुगुलांना लग्नासाठी मदत करणाऱ्या दिग्गज ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असल्याची आख्यायिका आहे. व्हॅलेंटाईन आठवडा 7 फेब्रुवारी रोजी रोज डेने सुरु होतो आणि १४ फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाईन डे नंतर संपतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा आपल्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या भेटवस्तू देऊन साजरा केला जातो. रोज डे, प्रपोज डे, किस डे, हग डे, चॉकलेट डे, टेडी डे असे दिवस या व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरे केले जातात.Read More
एरवी प्रेमदिनानिमित्त ३० लाख गुलाब जगभरात पाठविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळची निर्यात यंदा शुन्यावर आली आहे. फुलशेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी अन्य…