वसंत मोरे

वसंत मोरे यांनी ९ जुलै २०२४ रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वसंत मोरे यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७५ साली पुण्यात झाला. वसंत मोरे हे एक व्यावसायिक आणि शेतकरी आहेत. वसंत मोरे यांची आधी कट्टर मनसैनिक अशी ओळख होती. राज ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत वसंत मोरेचं नाव घेतलं जात असे. वसंत मोरे हे आधी शिवसैनिक होते. मात्र, २००६ मध्ये मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज ठाकरेंची साथ दिली. त्यानंतर २००७ साली पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ८ नगरसेवक निवडून आले होते. २०१२ च्या पुणे मनपा निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते, त्यामध्ये वसंत मोरेही होते. वसंत मोरेंनी मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळलेली आहे. तसेच विधानसभा निवडणुकही लढवली होती. पण त्यांना अपयश आलं. २०१७ साली नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुणे महापालिकेत गेले. २०१२ ते २०१३ या दरम्यान त्यांनी पालिकेत विरोधीपक्ष नेतेपदही भूषवलं. वसंत मोरे यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली. पण यामध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर ९ जुलै २०२४ रोजी वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.


Read More
uddhav thackeray on pune swargate rape case
Pune Rape Case Updates Today : “जीव जळतो हे सगळं बघून”, उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन, शिवशाही बस बलात्कार प्रकरणावर उद्विग्न प्रतिक्रिया!

Pune Swargate Rape Case News Today: स्वारगेट बस स्थानकावर वसंत मोरेंनी आंदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला.

What Vasant More Said?
Vasant More : वसंत मोरेंचा गंभीर आरोप; “स्वारगेट आगारात रोज बलात्कार होत आहेत, बसेसचं लॉजिंग करुन…”

वसंत मोरे यांनी आज स्वारगेट आगार या ठिकाणी जाऊन सुरक्षा रक्षकांचं केबीन फोडलं. तसंच गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत.

Vasant Mores attack on Tanaji Sawant
Vasant More:”पोरगं घरी नसली की पोटात गोळा येतो…”; वसंत मोरेंचा तानाजी सावंत यांना टोला

Vasant More: माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषीराज सावंत काल दुपारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर…

Vasant More
मला धमकी देणाऱ्यामागे ‘या’ नेत्याचा हात; वसंत मोरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले, “१५ दिवसांपूर्वी…”

वसंत मोरे यांनी धमकी प्रकरणी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती. तसेच त्यांनी एक ऑडिओ क्लिपदेखील…

vasant more
“मनसेच्या कार्यकर्त्याकडून मला जीवे मारण्याची धमकी”, ऑडियो क्लिप शेअर करत वसंत मोरेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “मी पुन्हा…”

एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत वसंत मोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच त्यांनी मोबाईल संभाषणाची एक ऑडिओ क्लिपदेखील…

Uddhav Thackeray on Vasant More: "शिक्षा हीच आहे की..."; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले
Uddhav Thackeray on Vasant More: “शिक्षा हीच आहे की…”; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले प्रीमियम स्टोरी

वसंत मोरे यांनी आपल्या समर्थकांसह आज (९ जुलै) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वसंत…

Vasant More join Shiv Sena Uddhav Thackeray
‘इतर पक्षात सन्मान नाही’, वसंत मोरेंचा पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरेंची मनसेवर टीका

मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनसेवर…

Pune Leader Vasant More Joins UBT Shiv Sena
Vasant More join Shivsena: वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन, दिली पहिली प्रतिक्रिया

वसंत मोरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.…

Pramod Patil On Vasant More
“वसंत मोरेंना मनसे सोडल्याचा पश्चात्ताप होईल”, राजू पाटलांचा टोला; म्हणाले, “आता फेसबुक लाईव्हचं नेतृत्व…”

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वसंत मोरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संबंधित बातम्या