वसंत मोरे Photos

वसंत मोरे यांनी ९ जुलै २०२४ रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वसंत मोरे यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७५ साली पुण्यात झाला. वसंत मोरे हे एक व्यावसायिक आणि शेतकरी आहेत. वसंत मोरे यांची आधी कट्टर मनसैनिक अशी ओळख होती. राज ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत वसंत मोरेचं नाव घेतलं जात असे. वसंत मोरे हे आधी शिवसैनिक होते. मात्र, २००६ मध्ये मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज ठाकरेंची साथ दिली. त्यानंतर २००७ साली पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ८ नगरसेवक निवडून आले होते. २०१२ च्या पुणे मनपा निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते, त्यामध्ये वसंत मोरेही होते. वसंत मोरेंनी मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळलेली आहे. तसेच विधानसभा निवडणुकही लढवली होती. पण त्यांना अपयश आलं. २०१७ साली नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुणे महापालिकेत गेले. २०१२ ते २०१३ या दरम्यान त्यांनी पालिकेत विरोधीपक्ष नेतेपदही भूषवलं. वसंत मोरे यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली. पण यामध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर ९ जुलै २०२४ रोजी वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.


Read More
vasant more and many more candidates change party before election
9 Photos
Loksabha Election 2024: निलेश लंके ते वसंत मोरे; लोकसभेच्या तिकीटासाठी ‘या’ नेत्यांनी ऐनवेळी बदलला पक्ष

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी मागील काही दिवसात, अनेक नेत्यांनी विविध कारणे देत पक्ष सोडले आणि इतर…

ताज्या बातम्या