विकी कौशल Videos

अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. १६ मे १९८८मध्ये मुंबईच्या चाळीमध्येच विकीचा जन्म झाला. मुंबईमध्येच त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून त्याने काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या मसाना हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. मसान चित्रपटापूर्वी त्याने बॉम्बे वेलवेट चित्रपट केला. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नाही. मसाननंतर त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. राझी, लस्ट स्टोरी, उरी – द सर्जिकल स्ट्राइक, भूत, संजू, सरदार उधम यांसारखे त्याचे हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. उरी – द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. नुकतंच त्याला आयफा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. २०२१मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करत विकीने सगळ्यांना सुखद धक्का दिला.Read More

ताज्या बातम्या