Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

विजय देवरकोंडा Videos

दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता विजय देवरकोंडाचा जन्म ९ मे १९८९ रोजी झाला होता. त्याने प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजयने त्याचे शालेय शिक्षण श्री सत्य साई उच्च माध्यमिक विद्यालय, पुट्टापर्थी. लिटल फ्लॉवर ज्युनियर कॉलेज, हैदराबाद येथून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला आनंद नावाचा लहान भाऊ आहे. विजयने २०११ साली ‘नुव्विला’ चित्रपटामधून पदार्पण केले होते. त्याला २०१५ साली आलेल्या ‘येवडे सुब्रमण्यम’ चित्रपतील भूमिकेलेन ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्याने ब्लॉकबस्टर ‘पेल्ली चोपुलु’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’, ‘टॅक्सीवाला’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या. विजयने २०२२ साली ‘लायगर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, पण त्याचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता. ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदी रिमेकही बनवला गेला, त्यात शाहीद कपूरने मुख्य भूमिका केली होती. Read More