
विनोद तावडे हे भाजपाचे नेते आहेत. विनोद तावडे यांचा जन्म २० जुलै १९६३ मध्ये मुंबईत झाला. विनोद तावडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. १९९५ साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत भारतीय जनता पक्षाचं काम करण्यास सुरुवात केली. २००२ मध्ये विनोद तावडे विधानपरिषदेवर आमदार झाले. २०११ ते २०१४ यादरम्यान विनोद तावडे विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते होते. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांची तीन टर्म निवड झाली होती. २०१४ साली बोरीवली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. देवेंद्र फडणवीस मुंख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात विनोद तावडे हे शिक्षणमंत्री होते. २०१९ साली विनोद तावडे यांना विधानसभेचं टिकीट नाकारण्यात आलं होतं. सध्या विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राजनाथ सिंग यांच्यानंतर आता विनोद तावडे यांना भाजपात प्रमुख स्थान मानलं जातं.