इंटरनेटवर जेव्हा एखादा फोटो, व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला व्हायरल न्यूज (Viral News) असे म्हटले जाते. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर गुगल सर्च इंजिनच्या सहाय्याने बातमी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवली जाते. काही वेळेस या गोष्टी अल्गोरिदमुळे होतात, व्हायरल बातमी ट्रेंडमध्ये असते. तर अनेकदा देशामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी घडत असतात.
भूकंप, त्सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यावर किंवा एखाद्या पदावर ठराविक व्यक्तीची निवड झाल्यास – त्यावरुन व्यक्तीला कमी केल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो. अशा वेळेस त्याबाबतची माहिती सांगणाऱ्या बातम्या व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबर व्हायरल न्यूजचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.Read More