विशाखा सुभेदार News
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे . यासोबतच त्या एक उत्तम कॉमेडीयन म्हणूनही ओळखल्या जातात. ४६ वर्षीय विशाखा सुभेदार यांचा जन्म २२ मार्च १९७६ साली मुंबईत झाला आहे. विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडच्या काळात, विशाखा ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ६६ सदाशिव (२०१९) या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विशाखा व समीर चौघुले यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे.Read More