विष्णू मनोहर Videos

विष्णू मनोहर हे प्रसिद्ध शेफ आहेत. दूरचित्रवाणीवरील कुकरी शोमध्ये काम केल्याने महाराष्ट्रभर त्यांची ओळख निर्माण झाली. पुढे त्यांनी सलग ५३ तास स्वयंपाक करणे, ‘सर्वात लांब पराठा’ (५ फूट लांब आणि ५ फूट रुंद) बनवणे, तीन तासात ७००० किलोची महामिसळ बनवणे, ३२०० किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करणे, ३००० किलो खिचडी आणि ५००० किलो खिचडी दलिया बनवण्याचे असे अनेक विश्वविक्रमही केले आहेत. विष्णू मनोहर यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला. १९८६ मध्ये त्यांनी या क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी २००८ मध्ये त्यांचे पहिले रेस्टॉरंट सुरू केले. त्यांना पहिल्या दोन रेस्टॉरंटमध्ये अपयश आले, त्यानंतरही त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि तिसऱ्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना यश मिळाले. २००८ पासून १३ वर्षांच्या कालावधीत त्यांनी संपूर्ण भारतामध्ये ७ रेस्टॉरंट्स आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये २ रेस्टॉरेंट सुरू केले. याला त्यांनी ‘विष्णूजी की रसोई’ असं नाव दिलं. ते नवी दिल्लीच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या समितीचे सदस्यही बनले. विष्णू मनोहर यांनी ईटीव्ही मराठीवरील “मेजवानी” या शोच्या माध्यमातून ४००० हून अधिक एपिसोड आणि “मास्टर रेसिपीज” शोच्या २००० हून अधिक शोजचं रेकॉर्डही केलं. रेडिओ मिर्ची वरील “सिधे तवा से” आणि विधान भारतीवर “चुल्हा चौका” सारखे कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही त्यांनी केलं. त्यांनी २०१९ मध्ये “वन्स मोअर” नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. त्यातच त्यांनी अभिनयही केला. या चित्रपटात त्यांनी दोन पात्रे साकारली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते/दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘सर सेनापती हंबीरराव’ चित्रपटातही विष्णू मनोहर यांनी भूमिका केली आहे. याशिवाय त्यांनी पाककलेवर अनेक पुस्तकंही लिहिली आहेत.Read More

ताज्या बातम्या