विश्वास नांगरे पाटील (Vishwas Patil) आयपीएस अधिकारी आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या व्याख्यानांमुळे ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. ते सध्या मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आहेत.
२००८ च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म १ जून १९७३ रोजी सांगली जिल्ह्यातील कोकरूड (शिराळा) येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण शिराळा तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि बी. ए.चं शिक्षण कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून घेतलं. त्यांनी इतिहास विषयात सुवर्ण पदक पटकावून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि मग प्रशासकीय सेवेच्या तयारीला लागले. आतापर्यंत त्यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीसदल उपायुक्त, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई दक्षिण विभाग अप्पर पोलीस आयुक्त, नाशिक पोलीस आयुक्त म्हणून काम केलं आहे.Read More
Balasaheb Thacekray Death Anniversary : बाळासाहेब ठाकरेंच्या निधनावेळी अलोट गर्दी जमली होती. त्यांच्या अंत्यदर्शनावेळी जमलेल्या गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू नयेत…
याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देत तात्पुरतं अटकेपासून संरक्षण दिलं. यानंतर समीर वानखेडेंच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आपले टीकास्त्र सोडण्यापूर्वी त्यांनीच कष्टपूर्वक मिळवलेल्या…