व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) हे रशियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. ते पहिल्यांदा ३१ डिसेंबर १९९९ रोजी रशियाचे (Russia) तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यानी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००० मध्ये पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाले. ते ७ मे २००८ पर्यंत या पदावर होते. मात्र, रशियाच्या राज्यघटनेतील अटीनुसार त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता आलं नाही. यावेळी त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनी पुतिन यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं. त्यानंतर पुतिन ८ मे २००८ रोजी रशियाचे पंतप्रधान झाले.
सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर २०१२ ला पुतिन पुन्हा रशियाचे अध्यक्ष बनले. यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पुतिन यांनी रशियाच्या राज्यघटनेत बदल करून २०३६ पर्यंत स्वतः अध्यक्षपदाला मान्यता मिळवली. पुतिन यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा केबीजीमध्येही काम केलं आहे. Read More
रशियाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य अनिश्चित असून निर्बंध अधिक वाढले तर त्याचा दीर्घकालीन परिणाम रशियाच्या जनतेला भोगावा लागू शकतो. ट्रम्प यांनी रशियावरील…