व्लादिमिर पुतिन Photos

व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) हे रशियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. ते पहिल्यांदा ३१ डिसेंबर १९९९ रोजी रशियाचे (Russia) तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यानी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००० मध्ये पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाले. ते ७ मे २००८ पर्यंत या पदावर होते. मात्र, रशियाच्या राज्यघटनेतील अटीनुसार त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता आलं नाही. यावेळी त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनी पुतिन यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं. त्यानंतर पुतिन ८ मे २००८ रोजी रशियाचे पंतप्रधान झाले.

सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर २०१२ ला पुतिन पुन्हा रशियाचे अध्यक्ष बनले. यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पुतिन यांनी रशियाच्या राज्यघटनेत बदल करून २०३६ पर्यंत स्वतः अध्यक्षपदाला मान्यता मिळवली. पुतिन यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा केबीजीमध्येही काम केलं आहे.
Read More
Xi Jinping seen with PM Modi
15 Photos
Photos : ब्रिक्स शिखर परिषदेतील फोटो जगभरात व्हायरल; पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग, व्लादिमीर पुतिन या बड्या नेत्यांच्या झाल्या भेटी

BRICS Summit Pm modi and Xi Jinping viral Photos: रशियाच्या कझान येथे आयोजित १६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे काही फोटो…

POlitical leaders AI photos
10 Photos
नरेंद्र मोदी ते जो बायडेन; जगातील ‘हे’ शक्तिशाली नेते किशोरवयात कसे दिसले असते? पाहा AI फोटो

एआय वापरून जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांची किशोरवयीन फोटो तयार केली आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

46 Photos
Photos: दारिद्र्यात जन्म..ब्लॅक बेल्ट, गुप्तहेर ते दोन दशकं रशियावर राज्य; युक्रेन युद्धानंतर ‘व्हिलन’ ठरलेल्या पुतिन यांची गोष्ट

पुतिन यांची राजकीय कारकिर्द, लग्न, प्रेमप्रकरण आणि त्यांच्या आवडीनिवडी…

12 Photos
Photos: रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानं मोडला पुतिन यांच्या मुलीचा संसार; व्यावसायिक पतीनं दिला घटस्फोट

युद्धामुळे पुतिन यांच्या कुटुंबाला देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.

19 Photos
PHOTOS: ७०० गाड्या, ५८ विमानं, १९ घरं, आलिशान हवेली अन् कोट्यवधींची घड्याळं; पुतीन यांच्या संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल

पुतीन हे नेहमीच जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असल्याचं मानलं जात आहे

Petition Wants Switzerland To Oust Putins Rumoured Partner Alina Kabaeva Compares Her To Hitler Wife eva braun
30 Photos
Photos: “तिला हाकलून द्या”; पुतिन यांच्या Girlfriend विरोधात ५९ हजार अर्ज; हिटलरच्या पत्नीशी झाली तुलना

सध्या जगभरामध्ये तिची जोरदार चर्चा असून ती सध्या कुठे लपलीय यासंदर्भातील माहिती समोर आल्याचा दावा केला जातोय.

Letters On Russian Tanks Vehicles
40 Photos
Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

खास करुन इंग्रजीमधील झेड अक्षर असणारी अनेक वाहने या ताफ्यामध्ये दिसत असल्याने हे रशियाचं मिशन झेड असल्याची चर्चा रंगलेली. पण…

Anti Putin Protests
18 Photos
Photos: कोणी म्हणतंय हिटलर तर कोणी म्हणतंय नरकात जळणार; जगभरातील Anti-Putin मोर्चांमधील पोस्टर्स पहिलेत का?

रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जगभरातून त्यांचा निषेध केला जातोय.

People call President Volodymyr Zelensky real hero
36 Photos
Photos: सैन्यासोबत युद्धग्रस्त देशात फिरणारा, पळून जाण्यास नकार देणार अन्…; लोक म्हणतात, “हाच युक्रेन युद्धाचा खरा हिरो”

सध्या युक्रेन युद्धामुळे रशियन राष्ट्रध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या नावाबरोबरच सर्वाधिक चर्चेत असणारं नावं आहे, वोलोडिमिर झेलेन्स्की!

ताज्या बातम्या