आषाढी वारी २०२४ News

वारी (Wari) पुंडलिकाला भेटण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण पंढरपूरला आले. तेव्हा आई-वडिलांची सेवा करतोय, बाहेरच थांब असं पुंडलिकाने साक्षात श्रीहरी यांना सांगितले आणि बाजूला असलेली वीट घराबाहेर फेकली. त्या विटेवर श्रीकृष्ण उभे राहत त्यांनी पांडुरंग, विठ्ठलाचे रुप घेतले. ज्या ठिकाणी विठ्ठल विटेवर उभी राहिले, तेथे विठ्ठल-रखुमाईचे मंदिर तयार करण्यात आले.


वारकरी संप्रदायातील भक्तमंडळी दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारी करतात. एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरपर्यंत केली जाणारी पदयात्रा म्हणजे वारी होय. वारकरी संप्रदायालाच भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय असेही म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, एकूण १२ महिन्यांमध्ये ४ वेळा वारी असते. त्यातील प्रमुख वारी म्हणजे आषाढी वारी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तगण आपापल्या गावातून बाहेर पायी चालत एकत्र येतात. अनेकजण आपल्यासह पालख्या देखील घेऊन येत असतात.


आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari)भक्त पायी चालत असताना वारीचा मार्ग हा विविध संताच्या कर्मभूमीला लागून जातो. यामध्ये देहू, आळंदी अशा पवित्र स्थळांचा समावेश असतो. वारीसह संताच्या पालख्या देखील पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी असते. वारी ठराविक ठिकाणी मुद्दामाला असते. त्यात रिंगण हे विशेष आकर्षण पाहायला लोक लांबून येत असतात. आषाढी व्यतिरिक कार्तिकी वारीलाही वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे. कार्तिकी वारीमध्ये आषाढी वारीच्या उलट संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात. या शिवाय माघ आणि चैत्र महिन्यातही वारी असते. वारी यावरुनच या संप्रदायाचे नाव पडले आहे – वारी करणारे म्हणजे वारकरी. तेराव्या शतकामध्ये वारीचा उल्लेख पाहायला मिळतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. मिळालेल्या माहितीनुसार, हैबतबाबा आरफळकर यांच्यामुळे वारीमधील पालख्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. ते सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे देशमुख होते. त्यांच्यामुळे आजच्या युगातही वारीची परंपरा जगभरात पोहोचली असे म्हटले जाते.


Read More
sant Dnyaneshwar maharaj Palkhi sohla
पालखी सोहळ्यात कुठलीही परंपरा मोडीत अथवा बाधित झालेली नाही – योगी निरंजननाथ

सोहळ्यातील कुठलीही परंपरा मोडीत अथवा बाधित झाली नाही असा स्पष्ट खुलासा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी…

ashadhi wari 2024
आषाढीनिमित्त ९.५३ लाख भाविकांचा एसटी प्रवास, एसटीच्या तिजोरीत २८.९२ कोटी रुपयांची भर

यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागांतून बसचे नियोजन करण्यात आले होते.

bjp targets rahul gandhi sharad pawar
“शेवटी ते वारीला आलेच नाहीत”, शरद पवार-राहुल गांधींचा उल्लेख करत भाजपाचं टीकास्र!

भारतीय जनता पक्षानं आषाढी वारीवरून शरद पवार व राहुल गांधी या दोघांना लक्ष्य केलं आहे. मान्य करूनही वारीत सहभागी न…

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंची सध्याच्या सामाजिक स्थितीवर टीका, आषाढी एकदशीनिमित्त पोस्ट करत म्हणाले…

Raj Thackeray on AShadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

ashadhi Ekadashi 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न, दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी १०३ कोटींचा निधी मंजूर

आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली.

pandharpur Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashi 2024 Maha Puja: पंढरपुरात विठू नामाचा गजर… मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक शासकीय महापूजा संपन्न

CM Eknath Shinde at Pandharpur Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री…

really women can not go to wari due to responsibilities of family home and childrens education
वारीच्या वाटेवर कर्तव्य अन् जबाबदारीची वीट! विठू- रखुमाईची भेट महिलांसाठी का कठीण?

Ashadhi Wari : खरंच घरच्या जबाबदारीमुळे महिला इच्छा असूनही वारीत येऊ शकत नाही? मुलांचे शिक्षण, घरची जबाबदारी, शेतीचे कामे इत्यादी…

What Kiran Mane Said in his Post?
किरण माने यांची पोस्ट चर्चेत, “ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं बहुजनांना ‘पाप पुण्या’ची भीती दाखवून…”

किरण माने यांनी संत सेना न्हावी यांचे अभंग पोस्ट करत ब्राह्मण्यवादावर भाष्य केलं आहे.

cm Eknath shinde
मुख्यमंत्री शिंदे संत निळोबाराय पालखी सोबत चालले; पंढरीत येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देणार : शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर शहरात चक्क बुलेट वरून फिरले. आमदार समाधान आवाडे यांनी सारथ्य केले.