आषाढी वारी २०२४ Videos

वारी (Wari) पुंडलिकाला भेटण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण पंढरपूरला आले. तेव्हा आई-वडिलांची सेवा करतोय, बाहेरच थांब असं पुंडलिकाने साक्षात श्रीहरी यांना सांगितले आणि बाजूला असलेली वीट घराबाहेर फेकली. त्या विटेवर श्रीकृष्ण उभे राहत त्यांनी पांडुरंग, विठ्ठलाचे रुप घेतले. ज्या ठिकाणी विठ्ठल विटेवर उभी राहिले, तेथे विठ्ठल-रखुमाईचे मंदिर तयार करण्यात आले.


वारकरी संप्रदायातील भक्तमंडळी दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारी करतात. एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरपर्यंत केली जाणारी पदयात्रा म्हणजे वारी होय. वारकरी संप्रदायालाच भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय असेही म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, एकूण १२ महिन्यांमध्ये ४ वेळा वारी असते. त्यातील प्रमुख वारी म्हणजे आषाढी वारी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तगण आपापल्या गावातून बाहेर पायी चालत एकत्र येतात. अनेकजण आपल्यासह पालख्या देखील घेऊन येत असतात.


आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari)भक्त पायी चालत असताना वारीचा मार्ग हा विविध संताच्या कर्मभूमीला लागून जातो. यामध्ये देहू, आळंदी अशा पवित्र स्थळांचा समावेश असतो. वारीसह संताच्या पालख्या देखील पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी असते. वारी ठराविक ठिकाणी मुद्दामाला असते. त्यात रिंगण हे विशेष आकर्षण पाहायला लोक लांबून येत असतात. आषाढी व्यतिरिक कार्तिकी वारीलाही वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे. कार्तिकी वारीमध्ये आषाढी वारीच्या उलट संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात. या शिवाय माघ आणि चैत्र महिन्यातही वारी असते. वारी यावरुनच या संप्रदायाचे नाव पडले आहे – वारी करणारे म्हणजे वारकरी. तेराव्या शतकामध्ये वारीचा उल्लेख पाहायला मिळतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. मिळालेल्या माहितीनुसार, हैबतबाबा आरफळकर यांच्यामुळे वारीमधील पालख्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. ते सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे देशमुख होते. त्यांच्यामुळे आजच्या युगातही वारीची परंपरा जगभरात पोहोचली असे म्हटले जाते.


Read More
Exclusive glimpse of Thane To CSMT Ashadhi Ekadashi Local wari at Railway station
Thane To CSMT Ashadhi Ekadashi: लोकलमधून निघाली पालखी, पाहा Exclusive झलक

आषाढी एकादशीच्या निमित्त मध्य रेल्वेच्या ठाणे ते सीएसएमटी या लोकल ट्रेनमध्ये विठूमाउलीची पालखी निघाली होती. विठू माउली सेवा समिती, ठाणे…

On the occasion of Ashadhi Ekadashi official mahapuja of Shri Vitthal-Rukmini was completed by Chief Minister Eknath Shinde in Pandharpur
CM Shinde in Pandhrpur: मंडप आणि टोकन दर्शनासाठी १०३ कोटी रुपयांचा प्रकल्प, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली.…

In Pandharpur Vitthal Rukmini temple core decorated with silver meghdambri
Vitthal Mandir Pandharpur: विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्याला चांदीचा साज; मेघडंबरीची ही झलक पाहा

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दोन कोटी ४५ लाख रुपयांची चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली आहे. विठ्ठलासाठी १३० आणि माता रुक्मिणीसाठी…

पादुका नेण्यासाठी बस, विमान किंवा हेलिकॉप्टरचा पर्याय

ज्या मानाच्या सात पालख्या आहेत, त्या पालख्यांमधील संताच्या ज्या पादुका आहेत त्या देव भेटीसाठी पंढरपुरात निश्चित जाणार आहेत. दशमीला त्या…

ताज्या बातम्या