वाशिम

वाशिम (Washim) जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागात पश्चिमेला स्थित आहे. त्याच्या उत्तरेस अकोला, ईशान्येला अमरावती, दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेस बुलढाणा, पूर्वेस यवतमाळ अशी राज्ये आहेत. पैनगंगा ही या जिह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहते. पुढे ती वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या हद्दीतून वाहते. पैनगंगा नदीव्यतिरिक्त या जिह्यामध्ये कास नगी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी अशा नद्या आहेत. हा जिल्हा वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. त्याची पुढे सहा तालुक्यांमध्ये विभागणी करण्यात आली. मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम आणि रिसोड हे वाशिम जिह्यातील तालुके आहेत. वाशिम हे जिह्यातील सर्वात मोठे शहर आहे. तेथे जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शनही आहे. या जंक्शनमुळे हा जिल्हा अन्य जिल्ह्यांशी जोडला गेला आहे.


वाशिमला मोठा इतिहास लाभला आहे. एकेकाळी ही जागा वाकाटक राजवटीच्या वत्सगुल्मा वंशातील लोकांची राजधानी होती. तेव्हा वाशिम हे वत्सगुल्मा म्हणून ओळखले जात असे. वाकाटक राजवटीच्या प्रवरसेन प्रथम याच्या मृत्यूनंतर त्यांचा द्वितीय पुत्र सर्वसेन यांनी वत्सगुल्मा वंशाची स्थापना केली. सह्याद्री पर्वतरांगांपासून ते गोदावरी नदी दरम्यानचा भाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. त्यांनी अजिंठा येथील काही बौद्ध लेण्यांचे संरक्षण केले असे म्हटले जाते. पुढे मुघल काळात अकोला जिल्ह्याचा मोठा भाग अकबराच्या सोरकर किंवा नरनाळा या महसूल जिल्ह्यात समाविष्ट होता. १९०५ मध्ये ब्रिटीश राजवटीत वाशिमचे विभाजन करून अकोला जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा असे दोन स्वतंत्र जिल्हे करण्यात आले. तेव्हा वाशिम शहर हे अकोला जिल्ह्यामध्ये होते आणि राज्यकारभारासाठी संपूर्ण अकोला जिह्यावर अवलंबून होता. पुढे वाशिम जिल्ह्याची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली.


Read More
Dattatray Bharane appointed as Guardian Minister of Washim district
पालकमंत्री बदलले…वाशीम जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आता…

वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री…

washim district needs investment to accelerate industrial development
गुंतवणुकीअभावी वाशीमची वाट खडतर; रोजगारासाठी तरुणांचे स्थलांतरण; आरोग्यासह दळणवळणाच्या सुविधेला गती

जिल्ह्याच्या माथ्यावर लागलेला मागासलेपणाचा शिक्का पुसून काढण्यासाठी औद्योगिक विकासाला गती देण्याची गरज आहे.

case has been registered against a teacher for allegedly committing a crime against a female student in Washim district
खळबळजनक! कारने घरी सोडून देण्याच्या बहाणा; शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य…

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना वाशीम जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. द

washim district samruddhi expressway 65 accidents
महाकुंभमेळा काळात अपघातांची ‘समृद्धी’, वाशीम जिल्ह्यात महामार्गावर ४७ दिवसांत ६५ अपघात

प्रयागराज येथील महाकुंभमेळा नुकताच पार पडला. महाकुंभमेळाला जाण्यासाठी राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गाचा वापर केला.

Washim district, Maharashtra , Operation Dronagiri,
‘ऑपरेशन द्रोणागिरी’ पथदर्शी प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून एकमेव वाशीम जिल्ह्याची निवड; जाणून घ्या वैशिष्ट्ये

देशातील सहा विशेष जिल्ह्यांमध्ये वाशीमची निवड ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी करण्यात आली आहे.

guardianship of Washim district was given to Hasan Mushrif from 630 km away Kolhapur
वाशीम जिल्ह्याचे पालकत्व ६३० कि.मी.वर

वाशीम जिल्ह्याचे पालकत्व थेट ६३० कि.मी.वरील कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे प्रतिनिधित्व करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव

वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच लागवडीच्या नव्या वाटा निवडत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिया पिकाने अल्पावधीतच आकर्षित केले.

Image of punctured vehicles or stranded commuters on Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अचानक कशी पंक्चर झाली ५० हून अधिक वाहने? रस्ते विकास महामंडळाकडून मोठा खुलासा फ्रीमियम स्टोरी

Samruddhi Mahamarg : या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान या घटनेनंतर अनेक प्रवाशांना त्यांच्या वाहनाचे पंक्चर काढता न…

maharashtra cabinet expansion mla from akola and washim districts not get place in maharashtra cabinet
अकोला व वाशीम जिल्ह्याची पुन्हा उपेक्षा; मंत्रिमंडळात दोन्ही जिल्ह्याला स्थान नाहीच

अकोला जिल्ह्याला २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही.

Washim District Assembly Election Results, Washim Karanja Constituency Mahayuti, Risod Congress Victory,
वाशीम जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांचे गड अभेद्य, रिसोडमध्ये महायुतीतील कुरबुरी काँग्रेसच्या पथ्यावर

विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांचे गड अभेद्य राहिले आहेत. भाजप दोन, तर काँग्रेसने एका जागेवर आपले वर्चस्व कायम राखले.

Tapovan village, Karanja taluka, Washim district,
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच ‘या’ गावात मतदान, नागरिकांसाठी ऐतिहासिक आनंदाचा क्षण

वाशीम जिल्ह्यात सकाळपासून शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. प्रशासनाने त्याची…

संबंधित बातम्या