वाशिम News

वाशिम (Washim) जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागात पश्चिमेला स्थित आहे. त्याच्या उत्तरेस अकोला, ईशान्येला अमरावती, दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेस बुलढाणा, पूर्वेस यवतमाळ अशी राज्ये आहेत. पैनगंगा ही या जिह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहते. पुढे ती वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या हद्दीतून वाहते. पैनगंगा नदीव्यतिरिक्त या जिह्यामध्ये कास नगी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी अशा नद्या आहेत. हा जिल्हा वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. त्याची पुढे सहा तालुक्यांमध्ये विभागणी करण्यात आली. मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम आणि रिसोड हे वाशिम जिह्यातील तालुके आहेत. वाशिम हे जिह्यातील सर्वात मोठे शहर आहे. तेथे जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शनही आहे. या जंक्शनमुळे हा जिल्हा अन्य जिल्ह्यांशी जोडला गेला आहे.


वाशिमला मोठा इतिहास लाभला आहे. एकेकाळी ही जागा वाकाटक राजवटीच्या वत्सगुल्मा वंशातील लोकांची राजधानी होती. तेव्हा वाशिम हे वत्सगुल्मा म्हणून ओळखले जात असे. वाकाटक राजवटीच्या प्रवरसेन प्रथम याच्या मृत्यूनंतर त्यांचा द्वितीय पुत्र सर्वसेन यांनी वत्सगुल्मा वंशाची स्थापना केली. सह्याद्री पर्वतरांगांपासून ते गोदावरी नदी दरम्यानचा भाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. त्यांनी अजिंठा येथील काही बौद्ध लेण्यांचे संरक्षण केले असे म्हटले जाते. पुढे मुघल काळात अकोला जिल्ह्याचा मोठा भाग अकबराच्या सोरकर किंवा नरनाळा या महसूल जिल्ह्यात समाविष्ट होता. १९०५ मध्ये ब्रिटीश राजवटीत वाशिमचे विभाजन करून अकोला जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा असे दोन स्वतंत्र जिल्हे करण्यात आले. तेव्हा वाशिम शहर हे अकोला जिल्ह्यामध्ये होते आणि राज्यकारभारासाठी संपूर्ण अकोला जिह्यावर अवलंबून होता. पुढे वाशिम जिल्ह्याची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली.


Read More
maharashtra cabinet expansion mla from akola and washim districts not get place in maharashtra cabinet
अकोला व वाशीम जिल्ह्याची पुन्हा उपेक्षा; मंत्रिमंडळात दोन्ही जिल्ह्याला स्थान नाहीच

अकोला जिल्ह्याला २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही.

Washim District Assembly Election Results, Washim Karanja Constituency Mahayuti, Risod Congress Victory,
वाशीम जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांचे गड अभेद्य, रिसोडमध्ये महायुतीतील कुरबुरी काँग्रेसच्या पथ्यावर

विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांचे गड अभेद्य राहिले आहेत. भाजप दोन, तर काँग्रेसने एका जागेवर आपले वर्चस्व कायम राखले.

Tapovan village, Karanja taluka, Washim district,
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच ‘या’ गावात मतदान, नागरिकांसाठी ऐतिहासिक आनंदाचा क्षण

वाशीम जिल्ह्यात सकाळपासून शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. प्रशासनाने त्याची…

Akola district recorded 29 87 percent polling while Washim district 29 31 percent voting till 1 pm
अकोला जिल्ह्यात २९.८७ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात २९.३१ टक्के मतदान

अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी २९.८७ टक्के, तर वाशीम जिल्ह्यातील तीन मतदारसंघात २९.३१ टक्के मतदान झाले.

Washim District, maha vikas aghadi, mahayuti
वाशीम जिल्ह्यात तिरंगी-चौरंगी सामने; जातीय समीकरण, मतविभाजन कुणाच्या पथ्यावर?

महायुती व मविआला बंडखोरी थोपवण्यात अपयश आल्याने वाशीम, रिसोड व कारंजा मतदारसंघात तिरंगी-चौरंगी सामने होणार आहेत.

vidhan sabha election 2024 in Akola, Washim district rebel challenge
बंडोबांचा थंडोबा करण्याचे नेत्यांपुढे आव्हान; अकोला, वाशीम जिल्ह्यात ‘उदंड जाहले बंड’;…तर राजकीय समीकरणाला ‘फटाके’

४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असल्याने त्या अगोदर बंडखोरांना माघार घेण्यासाठी तयार करण्याचे आव्हान पक्षांपुढे राहील.

Washim Constituency, Washim BJP,
VIDEO : भाजपने तिकीट कापले अन् आमदार रडायला लागले; म्हणाले, “पक्षाने माझ्यावर…”

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने वाशीम मतदारसंघात भाकरी फिरवली आहे. विद्यमान आमदार लखन मलिक यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापले.

Lakhan Malik
Lakhan Malik : भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे आमदार लखन मलिक ढसाढसा रडले; म्हणाले, “इमानदारीने काम केलं, पण…”

Lakhan Malik : वाशीम मतदारसंघात भाजपाने भाकरी फिरवली आहे. विद्यमान आमदार लखन मलिक यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापले आहे.

Sujat Ambedkar on Raj Thackeray
Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…” फ्रीमियम स्टोरी

सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कडवी टीक केली. ते वाशिम येथे बोलत होते.

Sanjay Rathod, Pohradevi, MLA position,
संजय राठोड यांना शह देण्यासाठी भाजपची खेळी? पोहरादेवीतील नाराजी दूर करण्यासाठी धर्मगुरूंना आमदारपद!

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांनी मंगळवारी शपथ घेतली.

Like British Congress only thoughts of looting country modi criticism in phohadevi washim
काँग्रेस इंग्रजांप्रमाणेच देशाला लुटण्याचा विचार करते….बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक….पोहरादेवीत पंतप्रधानांचा घणाघात….

एका परिवाराची देशावर सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसची धडपड असते. दलित, आदिवासी, वंचित घटकांना त्यांनी कधीही बरोबरीचे मानले नाही.

ताज्या बातम्या