पारतंत्र्यामध्ये असताना बंगाली बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगालमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही मोठ्या संख्येमध्ये होते. तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली एकता नष्ट करण्यासाठी ब्रिटीशांनी हिंदू बहुसंख्याक असलेला पश्चिम बंगाल आणि मुस्लीम बहुसंख्याक असलेला पूर्व बंगाल असे बंगालचे विभाजन केले. त्यानंतर पूर्व बंगाल पाकिस्तानमध्ये गेला आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये विलीन झाले. सत्तरच्या दशकामध्ये बांग्लादेश उदयास आला. पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशच्या सीमेशी संलग्न आहे. कोलकाता हे या राज्याची राजधानी आणि प्रमुख शहरांपैकी एक आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्यामधून कलेशी संबंधित अनेक जाणकार कलाकार आले आहेत. क्रिकेटपेक्षा फुटबॉलचे वेड असणारं हे एकमेव राज्य आहे. आधीच्या काळामध्ये येथे कॉंग्रेसची सत्ता होती. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. त्या सध्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. बांग्लादेशामधून होणारे अनधिकृत स्थलांतर ही येथील प्रमुख समस्या आहे. Read More
पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक आणि आर्थिक केंद्र असलेला हल्दिया हा मतदारसंघ सुवेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातील…
Mamata Banerjee: जर आता महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू झाल्या आणि टीएमसी प्रमुख महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पराभूत झाला, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी…
सीबीआयने मागील आठवड्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिषेक बॅनर्जी यांची ओळख न दर्शविता, फक्त त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. आरोपपत्रात सांगितल्याप्रमाणे…
Sutandra Chatterjee road accident: मद्यपी वाहन चालकांनी अश्लिल इशारे करत वाहनाचा पाठलाग केल्यामुळे पश्चिम बंगालमधील २७ वर्षी नृत्यांगणेचा अपघातात मृत्यू…