विश्वचषक २०२३ News

आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउंन्सिल (ICC) या जागतिक स्तरावरील संघटनेद्वारे दर चार वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे (Worlc Cup)आयोजन केले जाते. विश्वचषक स्पर्धेची सुरुवात १९७५ मध्ये झाली. पहिली विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. तेव्हा इंग्लंड व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका असे देश या स्पर्धेत सामील झाले होते. त्यावेळी पहिला विश्वचषक वेस्ट इंडिजच्या संघाने जिंकला. तेव्हापासून आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ५ वेळा. वेस्ट इंडिज आणि भारताने २ वेळा आणि इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका या देशांनी एकदा विश्वचषक जिंकला आहे.


 


१९७५ पासून ते २०२३ पर्यंत या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये ही स्पर्धा ६० षटकांची होती. तेव्हा कसोटी सामन्याप्रमाणे खेळाडू हे पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत असत. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठीही विशिष्ट नियम होते. या सर्व गोष्टी कालानुरुप बदलत गेल्या आहेत. ही एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आता ५० षटकांची झाली आहे. प्रत्येक संघाची जर्सी आहे, त्यातही ठराविक रंगाचा समावेश आहे. पहिल्या दोन-तीन विश्वचषक स्पर्धांच्या हंगामामध्ये क्रिकेट विश्वावर वर्चस्व असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला २०२३च्या विश्वचषकामध्ये सहभागी होता आले नाही. तर नेदरलॅंड्स, बांगलादेश सारख्या देशांच्या क्रिकेटच्या संघाने चांगली कामगिरी करत या स्पर्धेपर्यंत मजल मारली. 


 


सध्या भारतामध्ये विश्वचषक २०२३ सुरु आहे. भारतातल्या विविध स्टेडियम्समध्ये ५ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जात आहेत. स्पर्धेदरम्यान एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत- ज्यामध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतल्या सामन्याचाही समावेश आहे. संपूर्ण जगातील क्रिकेटवेडे चाहते या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. भारताकडे विश्वचषकाचे यजमानपद असल्याने देशात धामधूम आहे. २०११ प्रमाणे यंदाही यजमान विजेतेपद मिळवणार अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे.


Read More
R Ashwin take David Warner Interview on his Youtube channel
भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप फायनलमध्ये कसे आखले डावपेच? अश्विनच्या मुलाखतीत वॉर्नर म्हणाला- आयपीएलमुळे…

Ashwin Interviews David Warner: आर अश्विनने आयपीएलदरम्यान डेव्हिड वॉर्नरची मुलाखत घेतली. ज्याचा व्हीडिओ अश्विनने त्याच्या युट्यपब चॅनलवर शेअर केला आहे,…

rohit sharma gets emotional as he opens up on 2023
Video : वर्ल्डकपची आठवण काढताच रोहित शर्मा झाला भावुक, कपिल शर्माच्या शोमध्ये म्हणाला, “मी आणि विराटने…” प्रीमियम स्टोरी

वर्ल्डकपचा विषय काढल्यावर रोहित शर्मा झाला भावुक, चाहत्यांनी टाळ्या वाजवून दिलं प्रोत्साहन, व्हिडीओ व्हायरल

Mohammed Kaif Statement on Rohit Sharma Rahul Dravid Over IND vs AUS World Cup Final Defeat
२०२३ च्या विश्वचषकापूर्वी खेळपट्टीशी छेडछाड? रोहित शर्मा, द्रविडचे नाव घेत कैफचा मोठा दावा

Mohammed Kaif on ODI World up Final: वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये समालोचनाची जबाबदारी मोहम्मद कैफ यांच्यावर होती. तेव्हा कैफने…

rohit_sharma
ठरलं तर! टी-२० विश्वचषकासाठी रोहित शर्माच टीम इंडियाचा कर्णधार, जय शाह यांची घोषणा!

भारताने २०२१३ सालातील विश्वचषकात संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. सलग १० विजयामुळे यावेळी भारतच विश्वचषकावर आपले नाव कोरणार असे समस्त…

u19 world cup 2024 musheer khan all allround performance help india to beat new zealand
युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारताचा न्यूझीलंडवर वर्चस्वपूर्ण विजय; मुशीर खानची अष्टपैलू कामगिरी

सहारन माघारी परतल्यानंतर मुशीरने सर्व सूत्रे आपल्या हातात घेत चमक दाखवली व संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

No IND vs PAK in Under-19 World Cup Super Six Look Out For These Blockbuster Matches From Today Highlights Of WC point table
..म्हणून U-19 विश्वचषकात IND vs PAK होणार नाही! सुपर सिक्स टप्प्यात ‘हे’ सामने होणार ब्लॉकबस्टर

Under-19 WC Super Six IND vs PAK: २०२४ च्या अंडर-19 विश्वचषकाच्या गट टप्प्याचा समारोप ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवरचा विजय आणि भारताचा USA…

Mohammed Shami had a chronic problem with his left heel
World Cup 2023 : मोहम्मद शमीच्या दुखापतीबद्दल मोठा खुलासा! विश्वचषकादरम्यान सतत घेत होता इंजेक्शन्स

Mohammad Shami to take injection : सध्या मोहम्मद शमी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली दुखापतीमुळे सावरण्याचा प्रयत्न करत आहे. शमीने विश्वचषक…

IND vs AUS: Yes I was disappointed Akshar Patel was heartbroken after being out of the World Cup
World Cup: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार कामगिरीनंतरही अक्षर पटेल नाराज; म्हणाला, “विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर मी…”

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यानंतर अक्षर पटेलने विश्वचषकातून दुखापतीमुळे बाहेर का पडलो? यावर सूचक वक्तव्य केले…

I would do it again Mitchell Marsh gave an absurd reply after stepping on the World Cup trophy
World Cup: विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेल्या मिचेल मार्शचे बेताल वक्तव्य; म्हणाला, “मी पुन्हा तसेच…”

World Cup Trophy Controversy: मार्शने वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवून फोटो काढला होता. यानंतर यावरून बराच गदारोळ झाला. शमीनेही यावर…

Don't have so many expectations that your heart gets broken due to too much hype Kapil Dev's big statement on Team India's World Cup campaign
Kapil Dev: “इतक्या अपेक्षा ठेवू नका की…”, विश्वचषक फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवावर कपिल देव यांचे मोठे विधान

Kapil Dev on Team India: विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभव पचवणे कोणत्याही भारतीय चाहत्याला सोपे नव्हते. पण आता काळाबरोबर सगळेच त्यातून…

A triumph of Australian cricket culture World Cup 2023
खेळ, खेळी खेळिया: पराभव जिव्हारी लागला, तरी..

इंग्लंड १९७९ आणि भारत २०२३ या दोन विश्वचषक क्रिकेट स्पर्धामध्ये साम्य काय? दोन्ही स्पर्धामध्ये यजमान संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला!…