विश्वचषक २०२३ Videos

आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउंन्सिल (ICC) या जागतिक स्तरावरील संघटनेद्वारे दर चार वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे (Worlc Cup)आयोजन केले जाते. विश्वचषक स्पर्धेची सुरुवात १९७५ मध्ये झाली. पहिली विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. तेव्हा इंग्लंड व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका असे देश या स्पर्धेत सामील झाले होते. त्यावेळी पहिला विश्वचषक वेस्ट इंडिजच्या संघाने जिंकला. तेव्हापासून आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ५ वेळा. वेस्ट इंडिज आणि भारताने २ वेळा आणि इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका या देशांनी एकदा विश्वचषक जिंकला आहे.


 


१९७५ पासून ते २०२३ पर्यंत या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये ही स्पर्धा ६० षटकांची होती. तेव्हा कसोटी सामन्याप्रमाणे खेळाडू हे पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत असत. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठीही विशिष्ट नियम होते. या सर्व गोष्टी कालानुरुप बदलत गेल्या आहेत. ही एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आता ५० षटकांची झाली आहे. प्रत्येक संघाची जर्सी आहे, त्यातही ठराविक रंगाचा समावेश आहे. पहिल्या दोन-तीन विश्वचषक स्पर्धांच्या हंगामामध्ये क्रिकेट विश्वावर वर्चस्व असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला २०२३च्या विश्वचषकामध्ये सहभागी होता आले नाही. तर नेदरलॅंड्स, बांगलादेश सारख्या देशांच्या क्रिकेटच्या संघाने चांगली कामगिरी करत या स्पर्धेपर्यंत मजल मारली. 


 


सध्या भारतामध्ये विश्वचषक २०२३ सुरु आहे. भारतातल्या विविध स्टेडियम्समध्ये ५ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जात आहेत. स्पर्धेदरम्यान एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत- ज्यामध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतल्या सामन्याचाही समावेश आहे. संपूर्ण जगातील क्रिकेटवेडे चाहते या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. भारताकडे विश्वचषकाचे यजमानपद असल्याने देशात धामधूम आहे. २०११ प्रमाणे यंदाही यजमान विजेतेपद मिळवणार अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे.


Read More