महिला प्रीमियर लीग (WPL) ही बीसीसीआयतर्फ आयोजित केलेली टी-२० स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात ४ मार्च रोजी होणार आहे. आयपीएलप्रमाणे महिलांसाठीही टी-२० लीग असावी या उद्देशाने WPL चे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. २०१८ च्या आयपीएलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू दोन संघांमध्ये विभागून एक टी-२० सामना खेळण्यात आला. त्यानंतर २०१९, २०२० आणि २०२२ या वर्षांमध्ये आयपीएलमध्ये महिला क्रिकेटपटूंचे तीन सामने खेळवले गेले. पुढे आयपीएलप्रमाणे महिलांसाठीही टी-२० सामन्यांची लीग असावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला प्रीमियर लीगची घोषणा केली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात महिला क्रिकेटपटूंच्या लीगमध्ये पाच संघ असतील ही माहिती जाहीर करण्यात आली. त्यानुसार या लीगमध्ये दिल्ली, मुंबई, बंगलुरु, यूपी (उत्तर प्रदेश) आणि गुजरात या पाच संघांचा समावेश करण्यात आला. जानेवारी २०२३ मध्ये या WPLचा लिलाव पार पडला.
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये स्मृती मंधाना हिच्यासाठी सर्वाधिक बोली लावण्यात आली. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी या लीगमधील पहिला सामना नवी मुंबईमधील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. गुजरात आणि मुंबई हे दोन संघ या सामन्यामध्ये एकमेकांसमोर असणार आहेत. टाटा समूहाने महिला प्रीमियर लीगचे शीर्षक प्रायोजकत्व अधिकार प्राप्त केले आहेत.Read More