WPL 2025 Photos

महिला प्रीमियर लीग (WPL) ही बीसीसीआयतर्फ आयोजित केलेली टी-२० स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आयपीएलप्रमाणे महिलांसाठीही टी-२० लीग असावी या उद्देशाने WPL चे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. २०१८ च्या आयपीएलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू दोन संघांमध्ये विभागून एक टी-२० सामना खेळण्यात आला. त्यानंतर २०१९, २०२० आणि २०२२ या वर्षांमध्ये आयपीएलमध्ये महिला क्रिकेटपटूंचे तीन सामने खेळवले गेले. पुढे आयपीएलप्रमाणे महिलांसाठीही टी-२० सामन्यांची लीग असावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला प्रीमियर लीगची घोषणा केली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात महिला क्रिकेटपटूंच्या लीगमध्ये पाच संघ असतील ही माहिती जाहीर करण्यात आली. त्यानुसार या लीगमध्ये दिल्ली, मुंबई, बंगलुरु, यूपी (उत्तर प्रदेश) आणि गुजरात या पाच संघांचा समावेश करण्यात आला. जानेवारी २०२३ मध्ये या WPLचा लिलाव पार पडला.


महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये स्मृती मंधाना हिच्यासाठी सर्वाधिक बोली लावण्यात आली. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी या लीगमधील पहिला सामना वडोदरा कोटाम्बी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे दोन संघ या सामन्यामध्ये एकमेकांसमोर असणार आहेत. टाटा समूहाने महिला प्रीमियर लीगचे शीर्षक प्रायोजकत्व अधिकार प्राप्त केले आहेत.


Read More
Purple Cap to Shreyanka Patil for taking most wickets in WPL 2024
9 Photos
PHOTOS : कोण आहे श्रेयंका पाटील? अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे मोडले कंबरडे, ४ विकेट्स घेत दिला मोठा झटका

Who is Shreyanka Patil : रविवारी रात्री डब्ल्यूपीएल २०२४ मधील अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी संघात पार पडला. या…

Harmanpreet Kaur Breaks Many Records in WPL
9 Photos
PHOTO : मुंबईच्या हरमनप्रीत कौरनं मारलं दिल्लीच मैदान, गुजरातच्या गोलंदाजांना चीतपट करत लावली विक्रमांची रांग

WPL 2024 Updates : ९ मार्च रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने २० षटकांत…

Holi Celebration: From Ellyse Perry to Smriti Mandhana RCB players celebrate Holi fiercely in WPL 2023
9 Photos
WPL 2023: ‘रंग बरसे…!’ स्मृती मंधानासहित परदेशी खेळाडूंनी साजरी केली धुळवड, पाहा सेलिब्रेशनचे खास फोटोज

महिला प्रीमियर लीग (WPL २०२३) संघ RCBच्या खेळाडूंनी जोरदार धुळवड साजरी केली आहे. संघ व्यवस्थापनाने याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर…

ताज्या बातम्या