यामी गौतम Videos
यामी गौतम (Yami Gautam) ही बॉलिवूडमधी सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म २८ नोव्हेंबर १९८८ रोजी हिमाचल प्रदेशमधील बिसालपूरमध्ये झाला. तिने चंदीगडमध्ये (Chandigarh) प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. एलएलबी करण्यासाठी तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
या दरम्यान तिच्या मनामध्ये आयएएस होण्याचा विचारदेखील आला होता. परंतु वयाच्या विसाव्या वर्षी तिने अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. ‘चांद के पार चलो’ या मालिकेद्वारे तिच्या कलाविश्वातील प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर काही मालिकांमध्ये तिने काम केले. २००९ मध्ये यामीने एका कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. पुढे तेलुगू, पंजाबी, मल्याळम आणि तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती झळकली. ‘विकी डोनर’ या हिंदी चित्रपटामुळे ती खरी ओळख मिळाली. ‘बदलापूर’, ‘बाला’, ‘काबिल’ असे बरेचसे सुपरहिट चित्रपट यामीने केले आहेत. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास ठरला. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.
तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरशी तिने २०२१ मध्ये विवाह केला. तिचे ‘अ थर्सडे’, ‘दसवी’ असे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. अक्षय कुमारच्या ‘ओ माय गॉड २’ मध्ये ती यामी गौतम महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहे. Read More