यशवंतराव चव्हाण Photos

यशवंतराव चव्हाण हे राजकारणी होते. त्यांचं पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण असे होते. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखलं जाते. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला.


यशवंतराव चव्हाण हे काही काळ भारताचे उपपंतप्रधान होते. तसेच त्यांनी संरक्षणमंत्रीपदही भूषवलं. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्यांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली होती. यशवंतरावांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं. १९७७-७८ काळात केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेतेदेखील होते. तसेच आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही होते. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.


Read More