यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
समृद्ध वनांनी व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात विविध भागातील जंगल उन्हाळ्यातील वणव्यांमध्ये होरपळत आहेत. शनिवारी रात्री यवतमाळ वनविभागातील वडगाव धानारो वनपरीक्षेत्रातील वडगाव…