बी. एस. येडियुरप्पा Photos

बी. एस. येडियुरप्पा हे भाजपाचे नेते आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. चार वेळा त्यांनी मुख्यमंत्रीपद भुषविले. २००७ मध्ये फक्त आठ दिवस आणि २०१८ साली केवळ सात दिवसांसाठी ते मुख्यमंत्री होते. याशिवाय २००८ ते २०११ आणि २०१९ ते २०२१ या काळात देखील ते मुख्यमंत्री होते. येडियुरप्पा यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९४३ साली झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही वर्ष एका राइसमिलमध्ये कारकून पदावर नोकरी केली. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले येडियुरप्पा १९८३ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. १९८८ मध्ये ते कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले. कर्नाटकात गाजलेल्या खाणकाम प्रकरणी लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. मुख्यमंत्री असतानाच त्यांना तुरुंगात जावे लागले.Read More

ताज्या बातम्या