योगेंद्र यादव Photos
योगेंद्र यादव (Yogendra Yadav) हे भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६३ रोजी हरियाणा येथे झाला. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य शिक्षकी पेशात आहेत. त्यांचे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत, त्यासह त्यांनी तत्वज्ञान (Philosophy) या विषयामध्ये पदवोत्तर शिक्षण घेतले आहे. ते भारत सरकारद्वारे स्थापित विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद (NAC-RTE) चे माजी सदस्य आहेत. २००४ ते २०१६ या कालखंडामध्ये त्यांनी दिल्लीमधील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेमध्ये काम केले.
२०१५ पर्यंत ते आम आदमी पक्षामध्ये होते. आपमधून बाहेर पडल्यावर त्यांनी प्रशांत भूषण यांच्यासह मिळून स्वराज्य अभियान या पक्षाची स्थापना केली. २०२०-२१ मध्ये दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही त्यांनी भाग घेतला होता. Read More