व्हिडिओसाठी सर्वात लोकप्रिय असणाऱ्या युट्यूब या संकेतस्थळाची स्थापना १४ फेब्रुवारी २००५ रोजी झाली. स्टीव्ह चेन (Steve Chen), जावेद करीम (Jawed Karim) आणि चाड हर्ले (Chad Hurley) या तिघांनी युट्यूबची स्थापना केली होती. मे २००५ पर्यंत बिटा (Beta) व्हर्जन असल्यामुळे युट्यूबवर एका दिवसाला ३० हजार विझिटर मिळत होते. डिसेंबर २००५ साली अधिकृतपणे युट्यूबचे लाँचिंग झाल्यानंतर काही दिवसातच ही संख्या लाखोंच्या घरात गेली. नोव्हेंबर २००६ साली गुगलने १.६५ बिलियन डॉलर्स खर्च करुन युट्यूब विकत घेतले. गुगलने विकत घेतल्यापासून युट्यूबमध्ये अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. लाईव्ह स्ट्रिमिंग, लाँग फॉरमॅट व्हिडिओ अपलोड करणे, जाहीराती, डिसलाईकची संख्या गुप्त ठेवणे असे अनेक बदल युट्यूबमध्ये झालेले आहेत. व्हिडिओ फॉरमॅटमध्ये आज हजारो संकेतस्थळ इंटरनेटवर असतानाही युट्यूबने स्वतःची वेगळी ओळख जपलेली असून आपले अढळ स्थान कायम ठेवले आहे. Read More