युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा भारतीय संघाचा फिरकीपटू असून गेल्या ५-६ वर्षात त्याने अतिशय सुरेख कामगिरी केली आहे. रिस्ट स्पिनर म्हणजे मनगटी फिरकीपटू असणारा तो लेग स्पिनर असून सर्व खेळपट्ट्यांवर चेंडू वळवण्याची त्याच्याकडे कला आहे. कुलदीप यादव आणि चहल या दोघांची जोडीने विरोधी संघाला सळो की पळो करून सोडले होते म्हणूनच त्याच्या या जोडीला ‘कुलच्या’ असे नाव पडले आहे. तसेच युजवेंद्र चहल हा संघातील एक खोडकर खेळाडू म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
नेहमीच तो काही ना काही करत सोशल मीडियावर ट्रेंड असतो. त्याचे स्वतःचे चहल चॅनल आहे त्यावर तो संघातील खेळाडूंचे मजेशीर मुलाखती घेत असतो. तसेच त्याची पत्नी धनश्री देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.Read More
Kolkata rape-murder case: कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाबाबत क्रिकेटपटूच्या पत्नीने सोशल मीडियावर बलात्कार करणाऱ्याला फाशी देण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत अनेक क्रिकेटपटू…