झहीर खान हा भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात फार मोलाची भूमिका बजावली होती. आतापर्यंतच्या इतिहासात डावखुरा गोलंदाज म्हणून त्याचे नाव अग्रस्थानी आहे हे कोणालाही विसरता येणार नाही. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान शुक्रवारी (७ ऑक्टोबर) ४४ वर्षांचा झाला. आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झहीरने एकूण ६१० विकेट घेतल्या. तो ‘नकल बॉल’चा शोधकर्ता मानला जातो. २०११ च्या विश्वचषकात त्याने ज्या चेंडूने दहशत निर्माण केली होती. झहीरला कधीच क्रिकेटर व्हायचे नव्हते. त्याचे मन इंजिनियर होण्याचे होते, पण नशिबाने त्याला स्टार बनवले. मराठमोळ्या या खेळाडूने मराठीपण जपत अभिनेत्री सागरिका घाडगेसोबत विवाह केला. सध्या समालोचकाची भूमिका बजावत आहे.Read More