झाकीर नाईक Photos

मुस्लीम धर्मप्रचारक अशी ओळख असलेले डॉ. झाकीर नाईक यांचा जन्म मुंबईतील डोंगरी येथे १८ ऑक्टोबर १९६५ रोजी झाला होता. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर झाकीर नाईक यांनी सुरुवातीच्या काळात वैद्यकीय सेवा दिली, त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ इस्लामी धर्मगुरु होण्याचा निर्णय घेतला. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (Islamic Research Foundation) आणि पिस टीव्ही (Peace Tv) ची स्थापना करुन ते इस्लाम विषयांवर भाषणे देतात. २०१६ साली नाईक मलेशियात असताना त्यांच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून भारतीय तपाय यंत्रणा डॉ. झाकीर नाईक यांच्या मागावर आहे. डॉ. झारीक नाईक यांनी मलेशियामध्ये आश्रय घेतलेला आहे. २०१६ साली बांगलादेशमध्ये काही अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, ज्यात अनेक लोकांना मृत्यू झाला. अतिरेक्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी झाकीर नाईक यांचे भाषण ऐकले होते. ज्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला होता. झाकीर नाईक यांनी आजवर इस्लाम विषयावर ५० देशांत २००० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. सोशल मीडियाच्या सर्वच लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर त्यांचा वावर आहे. २०२२ साली कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये ते प्रमुख अतिथी होते. Read More