आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो.आइसक्रीम पार्लर असो, हॉटेल असो, घरच्याघरी तयार आइसक्रीम असो किंवा रस्त्यावरून घंटावाली गाडी घेऊन फिरणारा आइसफ्रुटवाला असो, आइसक्रीम या नावातच आपल्याला पार विरघळवून टाकायची ताकद आहे. एकूण काय, सुरुवातीच्या काळात आइसक्रीम ही श्रीमंतांची चैन होती. आइसक्रीमकरता लागणारा बर्फ तयार करणं वा त्यासाठी बर्फाळ पर्वतरांगांत माणसं नेमणं सर्वसामान्य माणसाला परवडण्याच्या पलीकडचं होतं. पण रेफ्रिजरेटर, मोटर्स, पॅकिंग मशीन यांच्या शोधाबरोबर व प्रसाराबरोबर आइसक्रीमचं उत्पादन सर्वसामान्यांपर्यंत आलं आणि आइसक्रीम ही थोरामोठय़ांची मक्तेदारी उरली नाही. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आइस्क्रीम आवडत असतील तर हैदराबादला मिळतील. सोन्याचे आईस्क्रीम देखील येथे उपलब्ध आहे. तेही २४ कॅरेट सोन्याचे आईस्क्रीम. अभिनव जेसवानी या फूड ब्लॉगरने या आइस्क्रीमचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. बघता बघता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या आइस्क्रीमचे नाव मिनी मिडास असे ठेवण्यात आले असून ते हैदराबादमधील ह्युबर अँड हॉली कॅफेमध्ये उपलब्ध आहे.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हे गोल्ड प्लेटेड आईस्क्रीम बनवताना दिसत आहे. सर्वप्रथम दुकानदार एक आइसक्रीम कोन घेतो. त्या कोनमध्ये चॉकलेट नट्स, ड्रायफ्रूट आणि चॉकलेट सिरप टाकतो. त्यानंतर डार्क चॉकलेट आइसक्रीम टाकतो. त्यानंतर चॉकलेट आईसक्रीम एका साच्यात टाकून कोनमध्ये भरतो. त्यावर सोन्याचा वर्ख लावतो. तसेच चेरी लावतो आणि खाऊ शकतो अशा चमच्यात जेली बॉल ठेवतो. शेवटी ती डिश सजवून ग्राहकाला देतो. अभिनव जेसवानीने जस्ट नागपूर थिंग्ज नावाच्या त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की हे २४ कॅरेट गोल्ड आइसक्रीम हैदराबादमधील ह्यूबर अँड हॉली नावाच्या कॅफेचे आहे. आजपर्यंत मी असे आईस्क्रीम कुठेही खाल्ले नाही. तुम्ही पण एकदा नक्की खाऊन बघा.
या आइसक्रीमची किंमत ५०० रुपये आहे. याशिवाय त्यावर अतिरिक्त कर भरावा लागेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे, तर व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी याला स्वादिष्ट म्हटले आहे. तर आइसक्रिमची किंमत सोन्याचा भाव पाहता खूपच कमी आहे असं एका युजर्सने म्हटलं आहे.