Shukra Grah’s Favourites mulank : अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी जाणून घेता येते. अंकशास्त्रामध्ये १ ते ९ अंकाचा समावेश असतो. हे अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक अंकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो.
आज आपण मूलांक ६ विषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचा जन्म ६, १५, आणि २४ तारखेला झाला त्यांचा मूलांक ६ असतो. या मूलांकचा स्वामी ग्रह शुक्र असतो. तो ऐश्वर्य, वैभव आणि लक्झरी जीवन देणारा ग्रह आहे. असं म्हणतात, या मूलांकवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा दिसून येते. आज आपण मूलांक ६ असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. (numerology this mulank of people are favourite of shukra grah they become rich and get money respect and success)
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक ६ असतो, ते खूप क्रिएटिव्ह विचाराचे असतात. अशा लोकांनी फॅशन, मिडिया, फिल्म इंडस्ट्री, नाटक तसेच मॉडलिंगमध्ये करिअर केल्यास चांगले येश मिळू शकते. जर या लोकांना बिझिनेस करायचा असेल तर फॅशन, बुटीक, दागिन्याचे दुकान, कपड्याचे दुकान आणि लक्झरी आयटमचे शोरूम सुरू केल्याने चांगला फायदा होऊ शकतो.
शुक्र ग्रहाचा प्रभावामुळे या राशीच्या लोकांना लक्झरी जीवन जगायला आवडते. या लोकांवर चारही बाजूने पैशांचा पाऊस पडतो. त्यांना कंजूषपणा आवडत नाही. ते फिटनेसची खूप काळजी घेतात. असे लोक मजेशीर स्वभावाचे असतात. हे लोक जिथे जातात. तिथे महफिल जमवतात. त्या लोकांना समाजात मान सन्मान मिळतो. त्यांना फिरायला खूप आवडते.
अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ असलेल्या लोकांजवळ नेहमी पैसा असतो. ते कमावण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करतात ज्यामुळे त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. त्यांना महागडे कपडे घालायला आवडतात. त्यांना नवनवीन गाडी खरेदी करायला आवडते. असे लोक आयुष्यभर श्रीमंत राहतात. ते लोक सर्व इच्छा पूर्ण करतात. ते जीवनाचा खूप मनापासून आनंद घेतात.