नवीन योजना, रक्कम परत करण्याबाबत सेबीच्या आदेशाला स्थगिती

नवी दिल्ली : नवीन रोखे योजना सादर करण्यासह गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्याबाबत सेबीने फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड कंपनीला दिलेल्या आदेशाला रोखे अपील लवादाने (सॅट) ने सोमवारी स्थगिती दिली.

Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
mutual funds
SEBI ने म्युच्युअल फंडांना विदेशी ETF मध्ये गुंतवणूक करण्यापासून रोखले, आता नवे पर्याय काय?
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद

फंड योजना व्यवस्थापनातील अनमिततेचा ठपका ठेवत सेबीने ७ जूनला फ्रॅंकलिन टेम्पल्टन असेट मॅनेजमेंट कंपनीला दोन वर्षांसाठी कोणताही नवीन रोखे फंड सादर करण्यास बंधन घातले होते. तसेच गुंतवणूकदारांचे ५१२ कोटी रुपये परत करण्यासह २५० कोटी रुपये तीन आठवडय़ात ‘इस्क्रो’ खात्यात जमा करण्याचे आदेश महिन्याच्या सुरुवातीला दिले होते.

फंड नियंत्रण यंत्रणा सेबीने दिलेल्या या आदेशाविरुद्ध फ्रॅंकलिन टेम्पल्टनने रोखे अपील लवाद या न्यायाधिकार यंत्रणेकडे दाद मागितली. सेबीने निर्बंध आणलेल्या सहा रोखे योजना सध्या बंद आहेत. या योजनांवर १२ टक्के वार्षिक व्याज देण्यासही सेबीने फंड घराण्याला बजावले होते. त्याचबरोबर पाच कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता.

फ्रॅंकलिन टेम्पल्टनमार्फत सध्या विविध २१ रोखे योजनांमधील निधीचे व्यवस्थापन होत आहे. सहा योजना (२३ एप्रिल २०२० रोजी) गुंडाळण्या पर्याय स्विकारणे म्हणजे नव्या कोणत्याही योजनांना प्रतिबंध करणे होत नाही, असा निष्कर्ष सॅटने काढला. सेबीमार्फत ठोठावण्यात आलेला दंड वा गुंतवणूकदारांना परत करावयाची रक्कम याबाबत आढावा घेण्याचे संकेत रोखे अपील लवादाने दिले. लवादाने या प्रकरणात सेबीला महिन्याभरात आपले म्हणणे मांडावयास सांगितले. या प्रकरणाची सुनावणी आता ३० ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. फ्रॅंकलिन टेम्पल्टनच्या सहा योजनांमार्फत २५,००० कोटी रुपयांचे व्यवस्थापन होत होते. या योजनांच्या लेखा परिक्षणासाठी सेबीने चोक्सी अँड चोक्सी या सनदी लेखापाल आस्थापनाची नियुक्ती केली होती.