बँक खातेदारांकडे असलेल्या ३७ कोटी कार्डापैकी केवळ १० ते १५ टक्के कार्डाद्वारेच ऑनलाइन व्यवहार होतात, असे रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. देशभरात विविध बँकांचे ३६.९० कोटी डेबिट तसेच क्रेडिट कार्डधारक आहेत. या कार्डामध्ये ३५ कोटी डेबिट तर १.९ कोटी क्रेडिट कार्डे आहेत.
क्रेडिट कार्डापैकी ३० टक्के कार्डाद्वारे ऑनलाईद्वारे खर्च केला जातो, तर उर्वरित हिस्सा डेबिट कार्डचा आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाद्वारे केलेल्या अभ्यासात छोटय़ा शहरांमधूनही कार्डाद्वारे ऑनलाइन व्यासपीठाचा वापर वाढल्याचे रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे. रेल्वे तिकीट, विद्युत उपकरणे, भाडे, दूरध्वनी तसेच कपडे आदींसाठी व्यवहार करण्याकरिता ऑनलाइनद्वारे कार्डाचा वापर अधिक होतो, असेही आढळून आले आहे.
मास्टरकार्डच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रकारच्या कार्डाद्वारे वेतन देय होण्याचे दिल्ली, मुंबईसारख्या २० शहरांमधील प्रमाण हे ७५ टक्के आहे, तर निमशहरी भागात हेच प्रमाण ४३ टक्के आहे. व्हिसाच्या दाव्यानुसार, विविध कार्डाद्वारे मोठय़ा प्रमाणात ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांचे मासिक वेतन हे ७५ हजार ते एक लाख रुपये दरम्यान आहे.
कार्डाचा ‘ऑनलाइन’ वापर अवघा १० टक्केच!
बँक खातेदारांकडे असलेल्या ३७ कोटी कार्डापैकी केवळ १० ते १५ टक्के कार्डाद्वारेच ऑनलाइन व्यवहार होतात, असे रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
First published on: 24-04-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 15 pct cards used only for online transactions rbi report