व्हाट्सअ‍ॅपच्या वाढत्या मागणीतही वुईचॅटसारखे संपर्क व माहिती जाणून घेण्याचे माध्यम मागे पडलेले नाही. गुगल प्लेवरून वुईचॅट डाऊनलोड करून घेण्याची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप्सच्या धर्तीवर गुगल प्लेच्या माध्यमातून जगभरातून वुईचॅट आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. याबाबत वुईचॅटची भारतातील कंपनी असलेल्या १०सी इंडियाच्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष निलय अरोरा यांनी सांगितले की, आमच्या वुईचॅटधारकांना अधिकाधिक एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आम्ही या तंत्रज्ञानात पुढेही नाविन्य आणत राहू.

Story img Loader