छोटय़ांसाठी विविध उत्पादनांची विक्री-शृंखला ‘मी एन् मॉम्स’ने नवजात बालक व शिशूंच्या निगेच्या उत्पादनांची ‘मी मी’ ही नवीन श्रेणी आपल्या सर्व स्टोअर्समधून उपलब्ध केली आहे. मार्च २०१३ अखेर एकूण उलाढालीत १०० कोटी रुपयांचे लक्ष्य गाठण्याचे कंपनीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे.
मी एन् मॉम्सच्या मुंबईतील तीन स्टोअर्समधून प्रारंभी नवीन ‘मी मी’ उत्पादने उपलब्ध असतील आणि टप्प्याटप्प्याने ती अन्य शहरात उपलब्ध होतील. कंपनीची देशभरात १८ हून अधिक स्टोअर्स कार्यरत असून, महाराष्ट्रात मुंबईव्यतिरिक्त पुण्यात तीन आणि नाशिकमध्ये एक सुसज्ज विक्री दालन आहे. रु. १९९ ते रु. ३४९ या दरम्यान किमती असलेली बेबी ऑइल, बेबी लोशन, बेबी पावडर, फोमी बबल बाथ, बेबी शाम्पू आणि नॅपी रॅश ही उत्पादने ‘मी मी’ श्रेणीत उपलब्ध असतील. नव्या उत्पादन श्रेणीमुळे मी एन् मॉम्स हे माता व बालक निगेच्या बाजारवर्गात अग्रस्थान मिळविण्याच्या दृष्टीने अग्रेसर बनले आहे, मी एन् मॉम्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नरेश खट्टर यांनी सांगितले. या बाजारवर्गात दर्जेदार उत्पादनांची उणीव भरून काढण्यात कंपनीने दिलेले योगदान व ग्राहकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, १०० कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य गाठता येईल, असे खट्टर यांनी सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा