२००० किमीचा कोस्टल रोड बनवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या शिवाय २७ हजार किमी रेल्वे लाइनचे विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणावेळी स्पष्ट केले. हायवेचे होणारे व्यवसायिकरण, त्यातून पैसा मिळवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
१५० नव्या हायस्पीड ट्रेन सुरू करणार असल्याची घोषणा करून अर्थमंत्री सीतारामन यांनी रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला. या नव्या रेल्वे कुठे आणि कधी सुरू होणार हे मात्र त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले नाही. मुंबई अहमदाबात बुलेट ट्रेनवर काम सुरू आहे, असेही सीतारामन यांनी सांगितले.
आणखी वाचा – Budget 2020 : २० लाख शेतकऱ्यांना सौरपंप मिळणार
उड्डान योजनेअंतर्गत नवीन १०० विमानतळं सुरू करणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. सध्या देशात या योजनेअंतर्गत अनेक विमानतळे सुरू करण्यात आली आहेत. पण त्यांना फारसा प्रतिसाद दिसत नाही. पण, काही भागातील प्रवाशांना या योजनेमुळे प्रवासासाठी नवा पर्यांय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आणखी १०० विमानतळे सुरू करण्यात येणार आहेत. २०२३ पर्यंत मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवे सूरू करणार असल्याचेही सीतारामन यांनी जाहीर केले.