जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधार आणि भारतात परतून आलेल्या वित्तीय सुधारणा यांच्या आशेच्या हिंदूोळ्यावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासारख्या व्यवसायातील २०१३ मधील वाढ उत्तुंग असून अधिकाधिक रोजगारनिर्मितीचे हे वर्ष ठरणार असल्याचा किरण दर्शविण्यात आला आहे.भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिस या आयटी कंपनीचे सह संस्थापक आणि कार्यकारी सह अध्यक्ष एस. गोपालकृष्णन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा आशावाद निर्माण केला आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, २०१२ हे वर्ष या क्षेत्रासाठी जागतिक स्तरावर खूपच अस्थिर राहिले आहे. तुलनेत २०१३ अधिक चांगले असेल, असा विश्वास वाटतो.
आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाला गोपालकृष्णन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निर्विघ्नपणे पार पडलेली निवडणूक आणि विभाजन न झालेल्या युरोपीय देशांचा आधार घेतला आहे. २०१३ हे वर्ष चांगले असेल याचा अर्थ भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींमध्ये वाढ होईल आणि तशी शक्यताही मला अधिक आहे, असेही ते म्हणाले.
सध्या या क्षेत्रात २५ लाख रोजगार असून वार्षिक १० टक्के वाढ जरी गृहित धरली तरी दोन ते अडिच लाख रोजगारनिर्मिती अशक्य नाही, असे नमूद करून त्यांनी भारतात गेल्या काही महिन्यांपासून राबविले जाणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळेही २०१३ मध्ये अर्थव्यवस्थेचा वेग ७ टक्क्यांवर पोहोचेल, असेही म्हटले आहे. आर्थिक वाढीवर आपण देत असलेला भर हा निश्चितच गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सकारात्मक दिशादर्शक आहे; एवढेच नव्हे नजीकच्या दिवसांमध्ये सरकारद्वारे अधिक प्रोत्साहनपूर्वक उपाययोजनांची घोषणा होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.
२०१३ रोजगारनिर्मितीचे वर्ष! अर्थात मदार सुधारणांवर ..
जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधार आणि भारतात परतून आलेल्या वित्तीय सुधारणा यांच्या आशेच्या हिंदूोळ्यावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासारख्या व्यवसायातील २०१३ मधील वाढ उत्तुंग असून अधिकाधिक रोजगारनिर्मितीचे हे वर्ष ठरणार असल्याचा किरण दर्शविण्यात आला आहे.भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिस या आयटी कंपनीचे सह संस्थापक आणि कार्यकारी सह अध्यक्ष एस. गोपालकृष्णन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा आशावाद निर्माण केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-01-2013 at 04:59 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2013 year of employment creation