टूजी ध्वनिलहरी परवाने वाटप प्रकरणात साक्षीदार म्हणून रिलायन्स – एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबांनी हे सपत्नीक दिल्ली उच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय अन्वेषण विभागाने अनिल यांच्यासह त्यांची पत्नी टीना अंबानी यांना न्यायालयात बोलाविण्याची मागणी केली होती. यानुसार अंबानी दाम्पत्यासह १३ जणांना समन्स बजाविले आहे. निकालाच्या दृष्टिने उभयतांची साक्ष महत्त्वाची आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहिद बलवा आणि विनोद गोएंका टुजी प्रकरणात चौकशीला सामोरे जात आहेत. याच स्वानमध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने ९९० कोटी रुपये गुंतवणूक आहेत. या प्रकरणाच्या अनेक बैठकी दरम्यान टीना अंबानी उपस्थित होत्या; आर्थिक व्यवहाराबाबत त्यांना अमर्याद मुभा होती, असा आक्षेपही तपास संस्थांनी घेतला.