देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक घडामोडींचा ओघ निरंतर सुरू असून, भारतीय चलन रुपयाने बुधवारी प्रति डॉलर तब्बल ४७ पैशांची कमाई केली. रिझव्‍‌र्ह बँकेने काल केलेल्या रेपो दरातील कपातीने अर्थविकासाला मिळालेली चालना आणि विदेशातून भांडवला ओघ वाढल्याने रुपयाचा हा भाव वधारला आहे.
 रिझव्‍‌र्ह बँकेच्या अनुकूल पतधोरणापायी देशांतर्गत भांडवली बाजाराच्या वधारलेल्या धारणेतून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात खरेदीचा जोम वाढला आहे. त्यांच्याकडून आलेल्या डॉलरच्या ओघाने रुपयाने दिवसभरात ४७ पैशांची मोठी कमाई केली. बुधवारी चलन बाजार बंद झाला त्यासमयी प्रति डॉलर विनिमय दर ५३.३० रुपये पातळीवर स्थिरावला, जो रुपयाचा तीन महिन्यांपूर्वीचा उच्चांक स्तर आहे. कालच्या दिवसात रुपयाने १४ पैशांची कमाई केली होती.
भांडवली बाजारात विदेशातून असाच ओघ सुरू राहिल्यास येत्या मार्चअखेपर्यंत रुपया/डॉलर दर ५२ च्या पातळीवर स्थिरावण्याचा कयास चलन बाजार विश्लेषक  करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा