देशातील विविध कंपन्यांमधील गैरव्यवहार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमालीचे वाढल्याचे मत एका सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. सर्वेक्षणात हिस्सा घेणाऱ्या ७१ टक्के कंपन्यांनी त्यांचा अशा घोटाळ्यांशी संबंध आल्याचे मान्य केले आहे.
क्रोल या संस्थेने जागतिक स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात, भारतात गेल्या वर्षी ६७ टक्के सहभागी कंपन्यांनी आर्थिक गैरव्यवहार व घोटाळ्यांचा या ना त्या कारणाने फटका बसल्याचे सांगितले होते; तर यंदाच्या वर्षांत ते प्रमाण ७१ टक्के झाल्याचे नमूद केले आहे. घोटाळ्याचा फटका बसत असल्याचे सर्वेक्षणातील ६९ टक्के सहभार्गींनी म्हटले आहे. भ्रष्टाचार, लाच ते वित्तीय गैरव्यवहार, माहितीची चोरी तसेच चल मालमत्ता हे या गैरव्यवहाराचे पर्याय सांगितले गेले आहेत.
लाचखोरीशी संबंधित प्रत्यक्ष गैरव्यवहाराचे प्रमाण जागतिक स्तरावर २० टक्के असताना भारताच्या उद्योग क्षेत्रात हेच प्रमाण ३७ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ३२ टक्के होते. म्हणजेच गेल्या वर्षी गैरव्यवहाराचा संबंध आल्याचे कमी कंपन्यांनी सांगितले होते.
सर्वेक्षण करणाऱ्या क्रोल इंडियाच्या प्रमुख रेश्मी खुराणा यांनी सांगितले की, येथे व्यवसाय करताना कंपन्यांच्या डोक्यात कायम गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार हा विचार राहिला आहे. भ्रष्टाचार आणि लाचखोरी यामुळेच येथील गुंतवणुकविषयक प्रस्तावांना विलंब होत असल्याचे आम्हाला अनेक आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक कंपन्यांबरोबर केलेल्या चर्चेतून जाणवले. घोटाळा प्रतिबंधक अशा चांगल्या यंत्रणेत व्यवसाय करण्यास आवडेल, असे अनेक कंपन्यांना वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा