मुंबई शेअर बाजाराने आतापर्यंत अनुभवलेल्या १० मोठय़ा घसरणीपैकी सात घसरण या सोमवारी नोंदल्या गेल्या आहेत. याहीपेक्षा विशेष म्हणजे – या सातही आपटी या २००८ च्या अमेरिकन मंदीच्या कालावधीतील आहेत. सर्वात मोठय़ा १० घसरणीपैकी सात घसरण या सोमवार तर दोन गुरुवार व एक मंगळवारी नोंदली गेली आहे.
२४ ऑगस्ट २०१५ रोजी तब्बल १,६२५ अंश आपटी नोंदविऱ्या बाजारात पुन्हा एकदा काळ्या सोमवारच्या अनुभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वीची मोठी आपटी २१ जानेवारी २००८ रोजी, सोमवारीच नोंदली गेली होती. तर एकाच व्यवहारात जवळपास ९०० अंश घसरण नोंदविणारे ३ व १७ मार्च २००८ हे दोन्ही दिवस सोमवारचेच होते.
व्यवहारातील सोमवार, २४ ऑगस्टची घसरण ही तिसरी मोठी ठरली आहे. यापूर्वी २००८ मध्ये २१ व २२ जानेवारी रोजी अनुक्रमे २,०६२.२० व २,२७२.९३ अंश घसरण सत्रात झाली होती. पैकी २१ जानेवारीला सोमवार होता. व्यवहारातील सर्वात मोठी घसरण नोंदविताना सेन्सेक्सने सहा सोमवार, दोन शुक्रवार व प्रत्येकी एक मंगळवार व बुधवार राखले आहेत.
काळ्या सोमवारप्रमाणे झालेले व्यवहाराने पुन्हा एकदा अमेरिकी मंदीची पुनरावृत्ती चीनमध्ये दिसू लागली आहे.
काळ्या सोमवारचे ठिपके..
* ७ वर्षांतील सर्वात मोठी आपटी
* ४ थ्या घसरणीची इतिहासात नोंद
* ७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूकदारांच्या मालमत्तेची रया गेली
* १०० लाख कोटी रुपयांखाली मुंबई शेअर बाजाराची मालमत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा