२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, अनेक आयकर आणि इतर गुंतवणुकीशी संबंधित कार्ये आहेत जी तुम्ही ३१ मार्च २०२२ पूर्वी पूर्ण करावीत. पुढील आर्थिक वर्षात कर वाचवायचा असेल तर त्यासाठी आत्तापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टी वेळेत केल्या नाहीत, तर तुम्ही कर लाभ किंवा इतर कोणताही मोठा फायदा घेण्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे, तुम्ही ३१.०३.२०२२ पूर्वी ही महत्त्वाची आयकर आणि वैयक्तिक वित्तसंबंधित कामे पूर्ण केल्याची खात्री करा. चला तर मग जाणून घेऊयात ३१ मार्चपूर्वी तुम्ही कोणती कामे करावीत.

पंतप्रधान गृहनिर्माण योजना

प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U) चे उद्दिष्ट EWS/LIG आणि MIG श्रेणीतील लोकांना शहरी घरे उपलब्ध करून देणे आहे. दरम्यान या EWS/LIG श्रेणी अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. या श्रेणीसाठी पात्र असलेल्यांसाठी सरकारच्या क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) अंतर्गत सवलतीच्या व्याजदरावर गृहकर्ज उपलब्ध करण्यात आले आहे.

New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?
maharashtra Mahayuti Govt schemes
Financial Burden on Maharashtra: मतदारांना आकर्षित करण्यासाठी २०० घोषणा; प्रतिवर्षी १ लाख कोटींचा बोजा; निवडणुकीसाठी महायुतीकडून राज्यावर बोजा?
GST tax evasion of Rs five to eight thousand crore through fake documents Main facilitator arrested from Gujarat
बनावट कागदपत्रांद्वारे पाच ते आठ हजार कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी; गुजरातमधून मुख्य सूत्रधार अटकेत
unified pension scheme
Money Mantra: युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय? याचा फायदा कोणाला मिळणार आहे?
Dev Uthani Ekadashi 2024 Date in Marathi | Kartiki Ekadashi 2024 Date
Dev Uthani Ekadashi 2024 Date : यंदा कार्तिकी एकादशी नेमकी कधी आहे? जाणून घ्या, कोणत्या तारखेपासून सुरू होणार शुभ कार्य?
US elections are held on the first Tuesday in November
विश्लेषण : अमेरिकेत मतदानासाठी केवळ ‘नोव्हेंबरचा पहिला मंगळवार’ हाच दिवस का? कारण व्यावहारिक की धार्मिक?

पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख

पॅनशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. यापूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ होती. तर तुम्ही आता हे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावे. जर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर याचा तुम्हाला दंड भरावा लागेल असे नाही तर तुमचे पॅन कार्ड देखील पूर्णपणे निष्क्रिय होऊ शकते.

PPF, NPS, SSY खाते सक्रिय करण्याची शेवटची तारीख

PPF, NPS, सुकन्या समृद्धी खाते (SSY) सारख्या काही गुंतवणुकींना सक्रिय ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात खात्यात किमान रक्कम जमा करणे आवश्यक आहे. PPF, SSY, NPS या योजनाच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम जाम केली नाही तर तुमचे ही खाती बंद होतील आणि नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी ती नियमित किंवा अनफ्रीझ करावी लागतील. खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी वेळ लागू शकतो आणि तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी खात्यात किमान रक्कम वेळेत जमा करावी.

एका आर्थिक वर्षात PPF खात्यासाठी किमान वार्षिक योगदान ५०० रुपये आहे. जर तुमच्या खात्यात किमान ५०० रूपये जमा झाले नसतील तर ते खाते बंद केले जाऊ शकते आणि पुढे पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. NPS खातेधारकांना किमान १००० रुपये योगदान देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, सुकन्या समृद्धी खाते सक्रिय ठेवण्यासाठी, प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५० रुपये जमा करणे आवश्यक आहे.

गृहकर्जावर अतिरिक्त वजावट

आयकर कायद्याच्या कलम ८०EEA अंतर्गत गृहकर्जावर (आयकर कायद्याच्या कलम २४ अंतर्गत २ लाखांपेक्षा जास्त) भरलेल्या गृहखरेदीदाराच्या व्याजासाठी १.५ लाख रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा लाभ ३१ मार्च २०२२ पर्यंत उपलब्ध आहे. तुम्ही कलम ८०EEA अंतर्गत गृहकर्जासाठी पात्र असल्यास, तुम्ही योजना संपण्यापूर्वी त्याचा लाभ घ्यावा.

आर्थिक वर्ष २०२१- २२ साठी कर वाचवण्याची अंतिम तारीख

तुम्ही अद्याप कर नियोजन पूर्ण केले नसेल किंवा १.५ लाख रुपयांची कलम ८०C मर्यादा पूर्ण केली नसेल किंवा अजून कोणताही कर लाभ घेतला नसेल, तर तुम्हाला घाई करणे आवश्यक आहे कारण याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. हे विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांनी जुन्या कर प्रणालीची निवड केली आणि नवीन कर प्रणालीसह जाण्यास सहमत नाही. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, तुम्हाला आयकर कायद्याच्या अध्याय VI A अंतर्गत प्राप्तिकर लाभ मिळू शकतात. PPF, लाइफ इन्शुरन्स, ELSS ते NSC, टॅक्स सेव्हिंग बँक डिपॉझिट इत्यादींमधून निवडण्यासाठी अनेक पर्याय आहेत.

जरी तुम्ही कलम ८०C मर्यादा आधीच संपवली असेल, तरीही तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी धारण करून कर वाचवू शकता. तुम्ही पालकांसाठी भरलेला प्रीमियम देखील कपातीसाठी पात्र आहे. सध्या ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी ही २५,००० रुपये आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ती ५०, ००० रुपये आहे. यापैकी कोणत्याही योजनेसाठी भरलेला प्रीमियम कलम ८०D अंतर्गत एकूण उत्पन्नातून वजा केला जातो.

विलंबित रिटर्न भरण्याची शेवटची तारीख

आर्थिक वर्ष २०२०- २१ किंवा मूल्यांकन वर्ष २०२१- २२ साठी विलंबित रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. या तारखेपर्यंत तुम्ही आयटीआर दाखल केली गेली नसेल तर तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो, तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना १००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

प्रधानमंत्री वय वंदना योजना

तुम्हाला नियमित मासिक उत्पन्नासाठी निधी जमा करायचा असेल, तर तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक करू शकता. PMVVY फक्त LIC India मध्ये उपलब्ध आहे आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी PMVVY योजना दरमहा देय ७.४० टक्के खात्रीशीर पेन्शन प्रदान करते. ३१ मार्च २०२२ पर्यंत खरेदी केलेल्या सर्व पॉलिसींसाठी १० वर्षांच्या पूर्ण पॉलिसी कालावधीसाठी पेन्शनचा हा खात्रीशीर दर देय असेल.